Gold-Silver Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Silver Price: सोन्या-चांदीचे भाव वधारले, काय आहे कारण?

भारतीय बाजारात सोने 61,700 ते 62,500 प्रति 10 ग्रॅम या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gold Silver Price सोने-चांदी हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ पाहायला मिळाली. सोन्याने केवळ भारतीय सराफा बाजारातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मुसंडी मारली आहे. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती भडकल्याची माहिती मिळतेय.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आता व्याजदर वाढविण्याच्या मनस्थितीत नाही. वायदे बाजारात सोने एका कालावधीसाठी जोर पकडेल. भारतीय बाजारात सोने 61,700 ते 62,500 प्रति 10 ग्रॅम या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.

आजचा भाव काय

गुडरिटर्न्सनुसार,आज सोने-चांदीत घसरण झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति तोळा 100 रुपयांनी घसरली. आज हा भाव 55,950 रुपये आहे तर 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,020 रुपये आहे.

110 रुपयांची प्रति तोळा घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळी चांदीचे भाव जाहीर झाले नाहीत. काल एक किलो चांदी 76,600 रुपये होती.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT