Gautam Adani Net Worth  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: शेअर बाजारात तेजी, अदानींनी पुन्हा रचला विक्रम; जगभरातील अब्जाधीशांना...

GQG Partners: हिंडेनबर्ग अहवाल (Hindenburg Research Report) प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली.

Manish Jadhav

Gautam Adani Net Worth: हिंडेनबर्ग अहवाल (Hindenburg Research Report) प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली. याचा परिणाम असा झाला की, अब्जाधीशांच्या यादीत अदानी 37 व्या क्रमांकावर घसरले.

मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून अदानींचे चांगले दिवस परत आल्याचे दिसत आहे. त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.

इतकेच नाही तर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Shares) ते मार्केट उघडताच अपर सर्किट पाहायला मिळत आहे. शेअर्समध्ये झपाट्याने रिकव्हरी झाल्यानंतर मार्केट कॅप एक लाख कोटींच्या वर पोहोचले आहे.

अब्जाधीशांच्या यादीत 26व्या स्थानावर पोहोचला आहे

जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) 26 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांची संपत्ती 11 अब्ज डॉलरने वाढली आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानीची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलरपर्यंत घसरली होती. शेअर्सच्या वाढीमुळे गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 26 व्या क्रमांकावर आहेत.

2 मार्चलाही या यादीत अव्वल ठरले

फोर्ब्सच्या विनर आणि लूजरच्या यादीत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3 मार्च रोजी 5.1 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यांच्यानंतर, बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या मालमत्तेत $3.6 अब्ज आणि जपानच्या तादाशी यानाई यांच्या संपत्तीत $1.7 अब्जचा फायदा झाला आहे. 2 मार्चलाही ते या यादीत अव्वल होते.

आज, मार्केट उघडल्यानंतर 2 तासांच्या आत, गौतम अदानी यांनी $4.8 बिलियनची बंपर कमाई केली. गौतम अदानी यांच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे ते जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत 37 व्या क्रमांकावरुन 26 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

अदानी समुहाने त्‍यांच्‍या चार सूचिबद्ध कंपन्यांमधील अल्प स्‍टेक अमेरिकन कंपनी GQG Partners (GQG Partners) ला 15,446 कोटी रुपयांना विकला.

वास्तविक, समूहाला येत्या काही महिन्यांत दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाची परतफेड करायची आहे. त्यामुळेच रोख रकमेची गरज असल्याने हा सौदा करण्यात आला आहे.

अदानी समुहाकडे एकूण 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून त्यापैकी 8 टक्के कर्ज पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस फेडायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT