FTX co-founder Sam Bankman-Fried
FTX co-founder Sam Bankman-Fried Dainik Gomantak
अर्थविश्व

FTX SBF: अब्जाधीश क्रिप्टोकरन्सी कंपनीचा मालक रातोरात झाला कंगाल, 24 तासांत 14.6 अब्ज डॉलर्स बुडाले

गोमन्तक डिजिटल टीम

FTX या क्रिप्टोकरन्सी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम बँकमन-फ्राइड रातोरात कंगाल झाले आहेत. फ्राइड यांची एका दिवसात एकूण संपत्ती सुमारे 94 टक्क्यांनी कमी झाली आहे. 15.2 अब्ज डॉलरचा मालक असलेल्या सॅम बँकमन-फ्राइड यांची संपत्ती 991.5 दशलक्ष डॉलर्स इतकी घसरली आहे. एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. अशी ब्लूमबर्गच्या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

सॅम बँकमन-फ्राइड हा 30 वर्षीय अब्जाधीश असून, त्यांची कंपनी Binance कडून खरेदी केली जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म Binance चे प्रमुख, चांगपेंग यांनी FTX खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अशी माहिती चांगपेंग झाओ यांनी एका ट्विटद्वारे दिली.

Coindesk नुसार, FTX विक्रीची बातमी येण्यापूर्वी, सॅम बँकमन-फ्रॉयडची एकूण संपत्ती 15.2 अब्ज डॉलर्स होती. एका रात्रीत त्यांची संपत्ती 14.6 अब्ज डॉलरने कमी झाली. 30 वर्षीय अब्जाधीश फ्रायडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोशल मीडियावर त्यांना एसबीएफ म्हणून ओळखले जाते. सॅम बँकमन-फ्रॉइड पुढील वॉरेन बफे तर नाहीत? असे ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या फॉर्च्यून मासिकाने म्हटले होते.

सॅम बँकमन-फ्रॉइडचे पालक स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. फ्रॉईडने प्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून शिक्षण घेतले आहे. 2017 मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या जगात येण्यापूर्वी त्याने वॉल स्ट्रीटमध्ये ब्रोकर म्हणून काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT