India Foreign Exchange Reserves: एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध तर दुसरीकडे इस्त्रायल हमास युद्धाने अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. एवढचं नाहीतर इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने विकसित आणि अविकसित देशांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, कच्च्या तेलात झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे देशाच्या (India) परकीय चलन साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांत एकूण घसरण 8 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. दुसरीकडे, परकीय चलन मालमत्तेतही लक्षणीय घट दिसून आली आहे. उलट सोन्याचा साठा वाढला आहे.
याआधी परकीय चलनाचा साठा सलग सात आठवडे वाढला होता. त्यामुळे देशाचा परकीय चलन साठा 648 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. देशाच्या परकीय चलनाचा साठा $650 अब्जचा स्तर ओलांडेल अशी अपेक्षा होती. मात्र हे होऊ शकले नाही. देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीबाबत रिझर्व्ह बँकेने कोणत्या प्रकारची आकडेवारी सादर केली आहे तीही समजून घेऊया...
दरम्यान, 19 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 2.28 अब्ज डॉलर्स म्हणजेच 23 हजार कोटी रुपयांनी कमी होऊन 640.33 अब्ज डॉलरवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून वाढल्यानंतर गेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 5.40 अब्ज डॉलरने कमी होऊन 643.16 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. 5 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात ते $648.56 अब्ज डॉलरच्या नवीन लाइफ टाइम लेवलपर्यंत पोहोचले होते. हा आकडा 650 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.
परकीय चलनाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. या कालावधीत परकीय चलन साठ्यात $8.23 ची घसरण दिसून आली आहे. भारतीय रुपयात हिशोब केला तर हा आकडा 63 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशाचे परकीय चलन 640 अब्ज डॉलरवर आले आहे. तर दोन आठवड्यांपूर्वी देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग सात आठवडे वाढ झाली होती. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात 32 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत परकीय चलन साठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 19 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या विदेशी चलन मालमत्तेत लक्षणीय घट झाली आहे. आकडेवारीनुसार, 3.79 अब्ज डॉलर्स म्हणजेच 32 हजार कोटी रुपयांहून अधिक चलन संपत्तीत घट झाली आहे. त्यानंतर चलन संपत्ती 560.86 अब्ज डॉलर्सवर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, सोन्याच्या साठ्यात 1.01 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, जी एकूण 56.81 अब्ज डॉलरवर गेली आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, SDR $ 43 दशलक्षने कमी होऊन $ 18.03 अब्ज झाला आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताच्या रिजर्व्ह डिपॉजिट देखील $2 दशलक्षने कमी होऊन $4.63 अब्ज झाले आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.