Investment Tips Dainik Gomantak
अर्थविश्व

गुंतवणुकीत 15-15-15 चा नियम पाळून बना कोट्यधीश

पंकज मठपाल यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवल्यास आणि सरासरी वार्षिक 15 टक्के परतावा मिळाल्यास तो करोडपती होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15-15-15 चा नियम पाळल्यास तुम्ही ठराविक वेळेत करोडपती होऊ शकता. 15-15-15 म्हणजे दर महिन्याला गुंतवायची रक्कम, वेळ आणि व्याजदर. ऑप्टिमा मनी मैनेजर्सचे फाउंडर आणि सीईओ पंकज मठपाल यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवल्यास आणि सरासरी वार्षिक 15 टक्के परतावा मिळाल्यास तो करोडपती होऊ शकतो. (Follow 15 15 15 rule to become millionaire)

मठपाल यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने 15 वर्षे दरमहा 15 हजार रुपये जमा केले तर त्याला एकूण 27 लाख रुपये गुंतवावे लागतील. परताव्याचा वार्षिक सरासरी दर 15 टक्के असल्यास, त्याला 27 लाखांच्या गुंतवणुकीवर (Investment) 15 वर्षांत एकूण 74,52,946 रुपये परतावा मिळू शकेल. अशा प्रकारे त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.01 कोटी रुपये होईल. अशाप्रकारे, उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य होईल. मठपाल स्पष्ट करतात की, 15,000 रुपये दरमहा गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीने वाढत्या उत्पन्नावर (Income) गुंतवणूकीची रक्कम वाढवली, तर तो पूर्ण होण्याआधीच लक्षाधीश होण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक फायदे
वित्तीय नियोजक म्हणतात की, दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही 15 ऐवजी 20 वर्षांसाठी 15,000 रुपये गुंतवत राहिल्यास, तुम्हाला 20 वर्षांनंतर 15 टक्के दराने 2.27 कोटी रुपये मिळतील. आणखी पाच वर्षे गुंतवल्यानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम दुप्पट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT