Budget 2024 LIVE Updates in Marathi | Budget 2024 Session Live News | Today on 1st February 2024 India Finance Minister Nirmala Sitharaman presents the Union Interim Budget. Find out the Latest Income tax slabs and new income tax regime announcements | Gomantak Times Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2024: मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना मोठी भेट, घर घेण्यासाठी गृहनिर्माण योजना, टॅक्स स्लॅब 'जैसे थे'

Interim Budget 2024 Highlights: यंदाच्या अर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहे. परंतू यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने त्या आज फक्त तात्पुरता अर्थसंकल्प सादर करतील.

Ashutosh Masgaunde

FM Nirmala Sitharaman: दुपारी ४ वाजता अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद

अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती देणार आहेत. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर असल्याचे सरकारने म्हटले आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा मध्यमवर्गीयांना झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

PM Modi On Budget: अर्थसंकल्पात युवा आकांक्षांचे प्रतिबिंब 

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 बद्दल बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवकल्पना यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधीची तरतूद आहे."

Nitin Gadkari On Budget: रोजगाराच्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प

"भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या उद्दिष्टाच्या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हा अर्थसंकल्प भारतीय वित्तीय क्षेत्र मजबूत करेल. अंतरिम अर्थसंकल्प निर्यात वाढवेल, उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल."

Goa CM: अर्थसंकल्पीय भाषण पाहताना गोव्याचे मुख्यमंत्री

गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण पाहतानाचा क्षण.

Congress On Budget: वित्तीय तूट वाढली, सरकार फक्त दिखावा करत आहे

अंतरिम अर्थसंकल्प 2024 वर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, हा एक व्होट ऑन अकाउंट अर्थसंकल्प आहे, ज्याचा एकमेव उद्देश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारला चांगल्या आर्थिक स्थितीत ठेवणे हा आहे.

अर्थसंकल्पात 18 लाख कोटी रुपयांची तूट असणे ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. याचा अर्थ असा की सरकार आपला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेत आहे जे पुढील वर्षी आणखी वाढणार आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत

अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या, आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवली आहे. वास्तविक, अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत. यामुळेच सरकारने कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. मात्र, व्यावसायिक कर 22 टक्के करण्यात आला आहे.

Taxpayers In Country: 'देशातील करदात्यांची संख्या 2.4 पटीने वाढली'

'प्रत्यक्ष कर संकलन 10 वर्षांत तीन पटीने वाढले आहे. करदात्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. देशाच्या विकासात करदात्यांच्या योगदानाचा उपयोग होत आहे. सरकारने कराचे दर कमी केले आहेत. लागू करण्यात आलेल्या नवीन कर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. नवीन फॉर्म 26AS सह कर भरणे सोपे झाले आहे. 2013-14 मध्ये 93 दिवसांऐवजी आता 10 दिवसात परतावा दिला जात आहे.

Finance Minister Speech LIVE: 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'

'नवीन तंत्रज्ञान व्यवसायाला मदत करत आहे. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. अटलजींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानाचा नारा दिला होता.

याबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. १ लाख कोटी रुपयांचा निधी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने वितरित केला जाईल. यामुळे दीर्घकालीन आर्थिक मदत मिळेल. यामुळे खाजगी क्षेत्राला मदत होईल.

Nirmala Sitharaman Speech LIVE: मध्यमवर्गीयांना मिळणार हक्काचे घर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, सरकार गरीब लोकांना घरे खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी आर्थिक मदत करेल. त्या म्हणाल्या की, सरकार मध्यमवर्गीय लोकांना आणि झोपडपट्ट्या व चाळींमध्ये राहणाऱ्यांना घर खरेदी आणि बांधण्यासाठी मदत करणार आहे.

Finance Minister Speech LIVE: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • पीएम स्वानिधीच्या माध्यमातून 18 लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे.

  • किसान सन्मान निधी आणि पीएम फसल योजनेच्या माध्यमातून अन्नदाताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यात आले. 11.8 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे.

  • देशात 3000 नवीन ITII उघडण्यात आले.

  • 1.40 कोटी तरुणांना स्किल इंडियाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  • 15 नवीन AIIMS आणि 390 नवीन विद्यापीठे निर्माण करण्यात आली आहेत.

  • सर्वसामान्यांचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढले आहे.

FM Nirmala Sitharaman Speech LIVE: 'एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज मिळणार'

छतावरील सौरऊर्जेच्या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. यामुळे 15-18 हजार रुपयांची बचत होणार आहे. ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्सची मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाणार आहे.

Nirmala Sitharaman Speech LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्प 

"...आपल्या तरुण देशाला उच्च आकांक्षा आहेत, वर्तमानात अभिमान आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशा आणि आत्मविश्वास आहे. आम्ही आशा करतो की, आमच्या सरकारच्या उत्कृष्ट कार्याला देशवासीय पुन्हा एकदा जनादेशाचा आशीर्वाद देतील."

Interim Budget 2024: मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी 

मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. काही वेळानंतर अर्थमंत्री संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

सुरुवातीच्या मंदीनंतर बाजार सावरला; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टी 21750 च्या पार

अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. सकारात्मक सुरुवातीनंतर बाजारात मंदी दिसून आली. मात्र, सुरुवातीच्या दबावातून बाहेर पडल्यानंतर बाजार पुन्हा सकारात्मक झाला आहे.

गुरुवारी, सेन्सेक्स 219.05 (0.30%) अंकांच्या वाढीसह 71,960.01 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी 58.46 (0.27%) अंकांनी वाढून 21,784.15 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू 

अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संसद भवनात सुरू झाली आहे. काही वेळाने निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

Annual Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत पोहोचल्या

अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत पोहोचल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

सकाळी 11 वाजता सुरू होणार अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण

यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटसाठी विशेष तयारी केली आहे. यावेळी निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून जनतेला विशेष अपेक्षा आहेत.

महागाई आणि बेरोजगारीवरून गदारोळ करण्याची विरोधकांकडून तयारी सुरू आहे. परंपरेनुसार फोटो सेशननंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. नंतर त्या संसदेत पोहोचतील आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत बजेट मंजूर होईल.

Budget And Share Market: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात

अर्थसंकल्पापूर्वी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४६ अंकांच्या वाढीसह ७१,९९८.७८ वर उघडला. तो उघडताच 72,000 चा आकडा गाठला आहे.

Budget 2024 News LIVE: राष्ट्रपती आणि अर्थमंत्र्यांची बैठक सुरू

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालयातून अर्थसंकल्प 'बुक-खाते' घेऊन राष्ट्रपती भवनात दाखल.

Budget Update: अर्थमंत्री मंत्रालयात दाखल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी अर्थ मंत्रालयाचील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत फोटोशूटसाठी त्या मंत्रालयात दाखल झाल्या आहेत.

वाढू शकतो किसान सन्मान निधी

तज्ज्ञांचा दावा आहे की, किसान सन्मान निधीची रक्कम 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, तर महिला शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळू शकतात. तसेच महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास प्राधान्य असेल. त्यांना इतरांपेक्षा एक टक्का स्वस्त कर्जाची तरतूद असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात जीवन विमा योजना देखील मिळू शकते असे जाणकारांचे मत आहे.

मध्यमवर्गीय, शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना अपेक्षा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

NIrmala Sitharaman Record: निर्मला सीतामरण यांचा विशेष विक्रम 

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतामरण सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. असे करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. त्यांच्या आधी हा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता.

त्याचबरोबर मनमोहन सिंग, पी चिदंबरम, अरुण जेटली आणि यशवंत सिंगा यांनी पाच अर्थसंकल्प सादर केले आहेत. मोरारजी देसाई यांच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.

Budget 2024 Live Updates: बजेटचे थेट प्रक्षेपण कुठे, कसे आणि कोणत्या वेळी पहाल

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहू शकता. याशिवाय डीडी नॅशनलवरही थेट प्रक्षेपण पाहता येईल. भाषण फोनवर लाईव्ह पाहायचे असेल तर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनेलला भेट देऊ शकता.

Budget Updates: अर्थमंत्र्यांच्या बजेट बॉक्समधून मोठ्या घोषणांची शक्यता

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांनी यापूर्वी सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या मंत्री यावेळी अर्थमंत्र्यांच्या बजेट बॉक्समधून अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT