Finance Minister Nirmala Sitharaman on US Tour will attend G-20 Council meeting Dainik Gomantak
अर्थविश्व

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अमेरिकेच्या दौऱ्यावर

अर्थमंत्री सीतारामण (Nirmala Sitharaman) 13 ऑक्टोबर रोजी नियोजित FMCBG मध्ये देखील सहभागी होतील, ज्यामुळे जागतिक टॅक्स करार सुरळीत होण्याची अपेक्षा आहे

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) जागतिक बँक (World Bank) आणि IMF च्या वार्षिक बैठका तसेच G-20 वित्त मंत्री (Finance Minister)आणि सेंट्रल बँक (Central Bank) गव्हर्नर्स च्या बैठकीत भाग घेण्यासाठी अमेरिकेच्या (USA) आठवडाभराच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यात सीतारामन अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे.(Finance Minister Nirmala Sitharaman on US Tour will attend G-20 Council meeting)

याबद्दल अधिक माहिती देताना 'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 11 ऑक्टोबर 2021 पासून अमेरिका दौऱ्यावर असताना, IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठका, G-20 FMCBG बैठक, भारत अमेरिका दरम्यानच्या आर्थिक चर्चा आणि गुंतवणुकीशी संबंधित इतर बैठकांमध्ये सहभागी होतील.' असे सांगितले आहे. त्याचबरोबर अर्थमंर्यांच्या अमेरिकेच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून, त्या मोठ्या पेन्शन फंड आणि खाजगी इक्विटी कंपन्यांसह गुंतवणूकदारांनाही संबोधित करणार आहेत आणि त्यांना भारताच्या वाढीच्या प्रवासाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित देखील करणार आहेत.

सध्या देशाचे अर्थकारण रुळावर येत आहे GDP FDIही बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताने सर्वाधिक विकास दर नोंदवावा अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारत मार्च 2022 पर्यंत 11 टक्के जीडीपी वाढ साध्य करू शकतो.असे बोलले जात आहे.

अर्थमंत्री सीतारामण 13 ऑक्टोबर रोजी नियोजित FMCBG मध्ये देखील सहभागी होतील, ज्यामुळे जागतिक टॅक्स करार सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.या करारानंतर, भारताला डिजिटल सेवा कर किंवा अशा इतर उपाययोजना मागे घ्याव्या लागतील आणि भविष्यात असे उपाय लागू न करण्याचे वचन द्यावे लागेल.

आंतरराष्ट्रीय कर प्रणालीमध्ये मोठ्या सुधारणांमध्ये, भारतासह 136 देशांनी जागतिक कर नियम बदलण्यास सहमती दर्शविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT