Father's Day Special Dainik Gomantak
अर्थविश्व

Father's Day Special: फादर्स डे निमित्त वडिलांना द्या अशा पध्दतीने आर्थिक आधार

फादर्स डे च्या निमित्ताने एखादे म्युचअल फंड किंवा आर्थिक गुंतवणुक करुन आर्थिक आधार बनू शकता.

Puja Bonkile

Father's Day Special: दरवर्षी 18 जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आईप्रमाणेच वडिलांचेही मुलांच्या जीवात महत्वाचे स्थान असते. जरी तुमचे वडील तुमच्यावर असलेले प्रेम तुमच्यासमोर व्यक्त करत नसले तरी त्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते. आज जर तुम्हाला कोणती चांगली भेटवस्तु द्यायची असेल तर आर्थिक मदत होईल अशी भेट दिल्यास त्यांने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.  

आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच गरजेच्या वेळी या भेटवस्तूंची मदत होऊ शकते. तुमच्या वडिलांची आर्थिक उद्देश पूर्ण करणाऱ्या या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

  • म्युच्युअल फंड SIP तून सुरुवात करा

फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना म्युच्युअल फंड एसआयपी भेट देऊ शकता. छोट्याशा रकमेतील गुंतवणूकीतून काही वर्षांनी त्यांच्या भविष्यासाठी चांगला मोठा फंड तयार होऊ शकतो.यामुळे त्यांना कोणतीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

  • आर्थिक योजना

तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुमच्या वडिलांसाठी सर्वसमावेशक गुंतवणूक योजनेची निवड करु शकता. तुम्ही सरकारी योजना, म्युच्युअल फंड, इक्विटी आणि इतर गोष्टींमध्ये देखील गुंतवणूक करु शकता. यामुळे कठिण काळात त्यांना मदत मिळेल.

  • आरोग्य विमा

फादर्स डे निमित्त तुम्ही वृद्ध वडिल असल्यास तुम्ही त्यांना आरोग्य विमा भेट देऊ शकता. वृद्धांसाठी आरोग्य विमा काढणे सोपे नाही, परंतु भेटवस्तू म्हणून दिल्यास ते गरजेच्या वेळी उपयोगी नक्की पडेल. अनेक कंपन्या ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासल्यानंतर त्यांना आरोग्य विमा देतात.

  • कर्जाची रक्कम परत करा

जर तुमच्या वडिलांच्या नावावर कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जाची परतफेड करणे ही सर्वात चांगली भेट असेल. त्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT