WhatsApp PF Balance Check 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

WhatsApp PF Balance Check 2026: पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

EPFO Whatsapp Service To Check PF Balance: नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक अत्यंत सोयीची आणि भन्नाट सुविधा सुरु केली.

Manish Jadhav

EPFO Whatsapp Service To Check PF Balance: नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक अत्यंत सोयीची आणि भन्नाट सुविधा सुरु केली. आता पीएफ खातेधारकांना आपला बॅलन्स किंवा पासबुक पाहण्यासाठी उमंग ॲपवर जाण्याची किंवा पोर्टलवर किचकट पासवर्ड टाकण्याच्या टेन्शनमधून पूर्णपणे मुक्ती मिळाली.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFOच्या स्थापना दिवसानिमित्त जाहीर केल्यानुसार, आता अगदी सोप्या पद्धतीने थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घरबसल्या पीएफ बॅलन्स आणि मागील व्यवहारांची माहिती मिळवता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन EPFO चा अधिकृत क्रमांक +91 87964 41800 सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲपवर जाऊन या क्रमांकावर 'हाय' पाठवावे, जिथे चॅटबॉट तुम्हाला हवी ती भाषा निवडण्याचा पर्याय देईल. पुढे विचारलेली माहिती भरुन आणि तुमच्या युएएन (UAN) नंबरशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून तुमची पडताळणी पूर्ण करावी लागेल.

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चॅटबॉटद्वारे काही सेकंदातच तुमच्या खात्यातील ताजा पीएफ बॅलन्स पाहू शकता. एवढेच नाही तर या सुविधेमुळे ईपीएफ पासबुक डाऊनलोड करणे आणि कंपनीने दरमहा तुमचे पैसे वेळेवर जमा केले आहेत की नाही हे तपासणे अत्यंत सोपे झाले. तसेच, खात्यातील मागील 5 ट्रान्झॅक्शनची माहिती देखील तुम्हाला एका क्लिकवर मिळवता येईल. मात्र, ही सुविधा वापरताना सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

नेहमी फक्त अधिकृत क्रमांकावरच मेसेज करा, तुमचा पीएफ खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबरच व्हॉट्सॲपसाठी वापरा आणि कोणतीही गोपनीय माहिती किंवा ओटीपी चुकूनही कोणाशी शेअर करु नका. ही सेवा केवळ माहिती पाहण्यासाठी आणि पासबुक डाऊनलोड करण्यासाठी आहे, त्यामुळे याद्वारे ऑनलाईन पैसे काढता येत नाहीत हे लक्षात ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'टीका नको, राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे द्या'; गिरीश चोडणकरांचा भाजपवर हल्लाबोल

Goa Politics: गोवा फॉरवर्ड-काँग्रेस जागावाटपाचा फैसला पुढील आठवड्यात! काँग्रेस कमकुवत असलेल्या जागांवर सरदेसाईंचा दावा

Goa Politics: आरजीत मोठा राजकीय भूकंप! आमदार वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी; परब गटाचे विधानसभेला पत्र

खरी कुजबुज: बंटींची गोव्‍यात 'एन्‍ट्री'

Donald Trump Assassination Plot: मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला 27 वर्षांची कठोर शिक्षा; अमेरिकन कोर्टाचा मोठा दणका

SCROLL FOR NEXT