PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Pension: हायर पेन्शनवर मोदी सरकारची मोठी अपडेट, नोकरी करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले!

Manish Jadhav

EPFO Pension Update: हायर पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन अपडेट आली आहे. जर तुम्हालाही हायर पेन्शनचा पर्याय निवडला असेल किंवा असे करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

EPFO च्या पेन्शन योजनेचे शेयरहोल्‍डर्स आणि पेन्शनधारक, ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडला आहे, त्यांना अतिरिक्त योगदान किंवा थकबाकी भरण्यास सहमती देण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ दिला जाईल.

यापूर्वी, नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला हायर पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी शेयरहोल्‍डर्संना चार महिन्यांचा वेळ देण्यास सांगितले होते.

दरम्यान, EPFO ने ग्राहकांना हायर पेन्शन निवडण्यासाठी नियोक्तासह संयुक्त पर्याय फॉर्म भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा प्रदान केली आहे.

यासाठी आधी 3 मे 2023 ही अंतिम मुदत होती, ती आता 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

जर हायर पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर अतिरिक्त योगदानाचा पर्याय कसा कार्य करेल आणि पेमेंटची पद्धत याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.

अतिरिक्त रक्कम प्रादेशिक अधिकारी ठरवतील

दुसरीकडे, ईपीएफओच्या शेअरहोल्डरला जास्त रक्कम मागितल्यास त्याला हायर पेन्शन योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय मिळेल की नाही हे देखील माहित नाही.

अतिरिक्त रक्कमेचा निर्णय क्षेत्रीय अधिकारी घेतील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. किती रक्कम निश्चित केली जाईल, त्याबद्दलची माहिती व्याजासह हायर पेन्शनसाठी निवडलेल्या शेअरहोल्डर्संना दिली जाईल.

संमती देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली

पेन्शनधारक/सदस्यांना पैसे जमा करण्यासाठी आणि निधी हस्तांतरणासाठी संमती देण्यासाठी तीन महिन्यांपर्यंतचा कालावधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

ईपीएफओचे प्रादेशिक अधिकारी निवृत्ती वेतनधारकांना किंवा सदस्यांना हायर पेन्शनसाठी अतिरिक्त निधी भरण्याची गरज सांगतील.

तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला, कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, हायर पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 1.16 टक्के अतिरिक्त योगदान EPFO ​​संचालित सामाजिक सुरक्षा योजनेत नियोक्ताच्या योगदानातून घेतले जाईल.

सध्या, सरकार 15,000 रुपयांच्या मूळ पगारावर EPS मध्ये सबसिडीच्या (Subsidy) रुपात 1.16 टक्के योगदान देते. तसेच, ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनेत कर्मचारी 12 टक्के योगदान देतात.

त्याचवेळी, नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के ईपीएसमध्ये जातो. उर्वरित 3.67 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT