Employees working in private company to get salary hike Dainik Gomantak
अर्थविश्व

खाजगी कंपनींच्या कर्मचाऱ्यांनो, तुमच्या पगारात घसघशीत वाढ

यासंदर्भात मोदी सरकारने नवीन नियम आणला असून 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशात अनेक जण खाजगी कंपनीत(Private Company) काम करतात सर्वात जास्त कर्मचाऱ्यांची(Employee) संख्या असणार क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्र आता याच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुप आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढणार आहे. आणि ही बेसिक सॅलरी(Basic Salary) 15000 हजारावरून 21000 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PF)

यासंदर्भात मोदी सरकारने नवीन नियम आणला असून 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. या नियमानुसार 1 ऑक्टोबर नंतर बेसिक सॅलरी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेतन कोडच्या कोडच्या नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकूण पगाराच्या 50% किंवा कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) असावा असे या वेतन कोडच्या नवीन नियमात सांगितले जाते. सध्या बहुतांश कंपन्या कर्मचार्‍यांचा मूलभूत पगार कमी ठेवतात आणि इतर भत्ते किंवां एक्सट्रा पे जास्त देतत् . परंतु नवीन वेतन कोड लागू होताच विद्यमान व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल. कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या सीटीसीच्या मूलभूत पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवावी लागेल. उर्वरित टक्के कर्मचार्‍यांना मिळणारे सर्व भत्ते मोजले जातील.

अशा परिस्थितीत पीएफ आणि ग्रॅच्युइटी मधील कर्मचार्‍यांचे योगदान वाढण्यासही मदत होईल अशी माहीतही समोर येत आहे. नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये केले जावे, अशी कामगार संघटनांची मागणी होती. असे झाल्यास खासगी कंपन्यांमध्ये काम कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत. आताच्या वेतन नियमांनुसार ज्यांना 15000 किंवा त्यापेक्षा कमी वेतन आहे अशांना PF भरणे अनिवार्य नाही.

हा नवीन नियम या वेतन संहितेची अंमलबजावणी यावर्षी 1 एप्रिलपासून करण्यात येणार होती, परंतु काही राज्ये अद्याप ती लागू करण्यास तयार नसल्यामुळे ते पुढे ढकलले गेले आहे. परंतु आता ऑक्टोबरमध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते. नवीन वेतन संहिता लागू झाल्यावर कर्मचार्‍यांच्या पगाराच्या रचनेत मोठा बदल होईल. ऑगस्ट 2019 रोजी संसदेने तीन कामगार संहिता, औद्योगिक संबंध, कामाची सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित नियम बदलले. हे नियम सप्टेंबर 2020 मध्ये मंजूर झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT