Union Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomanatak
अर्थविश्व

Education Budget 2023: 'या' शाळांमध्ये होणार बंपर भरती, अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली मोठी घोषणा

Union Finance Minister Nirmala Sitharaman: आदिवासी शाळांमध्ये 38 हजारांहून अधिक भरती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान केलेल्या घोषणेत सांगितले.

दैनिक गोमन्तक

Education Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी मोठ्या घोषणा करुन या वर्गाची विशेष काळजी घेतली आहे. आदिवासी शाळांमध्ये 38 हजारांहून अधिक भरती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान केलेल्या घोषणेत सांगितले.

यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य शाळाही उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षणावर अधिक भर दिला जाणार असून शिक्षणाची व्याप्तीही वाढणार आहे.

740 एकलव्य मॉडेल स्कूल, 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती

2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Budget) आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावरही भर देण्यात आला आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदिवासी मिशनसाठी 3 वर्षांमध्ये 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली.

अर्थमंत्री सीतारामन यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी (Students) 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरु करण्याची घोषणाही केली आहे. या शाळांमध्ये 38,800 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाचवा अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली आहे.

तसेच, पीएमपीबीटीजी विकास अभियान चालू आर्थिक वर्षात 7 टक्के आहे, तर 2023-24 मध्ये 6 ते 6.8 टक्के वाढीचा अंदाज आहे. अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री म्हणाल्या की, पीएमबीपीटीजी विकास अभियान विशेषत: आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरु केले जाईल. पुढील 3 वर्षांत ही योजना लागू करण्यासाठी 15,000 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

SCROLL FOR NEXT