Eblu Auto  Twitter
अर्थविश्व

Godawari Electric: एक रूपयाच्या खर्चात 2km धावणार, अशी इलेक्ट्रिक ऑटो तुम्ही म्हणाल फिटले पैसे

इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने EV रिटेल क्षेत्रात प्रवेश केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने EV रिटेल क्षेत्रात प्रवेश केला आहे. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये इलेक्ट्रिक ऑटो इब्लू रोजी आणि युनिसेक्स इलेक्ट्रिक सायकल इब्लू स्पिन लाँच केल्या आहेत.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे सीईओ हैदर खान (CEO Hayder Khan) यांनी सांगितले की, कंपनी इब्लू रोझी (L5M) वर तीन वर्षे किंवा 80,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी ​​आहे.

Eblu Auto

इब्लू रोझीची (Eblu) ऑपरेटिंग कॉस्ट खूपच कमी आहे. ते चालवण्यासाठी केवळ 50 पैसे प्रति किलोमीटर खर्च येतो असे सीईओ हैदर खान यांनी सांगितले.

इब्लू रोझी ऑटो एका चार्जवर 135 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या ऑटोची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात आणि सहा युनिट वीज लागते. अशा प्रकारे, त्याची ऑपरेटिंग किंमत सुमारे 50 पैसे प्रति किलोमीटर येते.

इब्लू स्पिन ही इलेक्ट्रिक सायकल आहे. यात युनिसेक्स डिझाइन, आधुनिक आणि स्टायलिश लूक आणि आरामदायी राइडसाठी एक मजबूत सुविधा आहे. ही इलेक्ट्रिक सायकल 6AH, 12AH आणि 18AH च्या बॅटरी पर्यायांसह उपलब्ध करण्यात आली आहे.

तिन्ही प्रकारांसाठी ड्रायव्हिंग रेंज 25 ते 65 किमी पर्यंत असेल. यात ओव्हर आणि अंडर-व्होल्टेज सुरक्षा आणि पोर्टेबल चार्जिंग सुविधा देखील असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT