Party On Plane Dainik Gomantak
अर्थविश्व

आता उडत्या अलिशान विमानात करा पार्टी, मिळणार अनेक सुविधा; एका तासासाठी मोजावे लागणार 'एवढे' रूपये

कबीर मूलचंदानी यांच्या 5 होल्डिंग्स नावाच्या कंपनीने पार्टी ऑन प्लेन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Party On Plane: पार्टी म्हटले की मस्ती, मज्जा आणि जल्लोष. पार्टीचे अनेक प्रकार आहेत. पण, हवेत उडत्या विमानात पार्टी करण्याची तशी संधी फारशी कोणाला मिळत नाही. पण, एक खासगी कंपनी आता ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे तुम्ही उडत्या विमानात पार्टी करू शकता.

कबीर मूलचंदानी यांच्या 5 होल्डिंग्स नावाच्या कंपनीने पार्टी ऑन प्लेन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कबीर मूलचंदानी यांच्या 5 होल्डिंग्सने 16 प्रवाशांच्या क्षमतेसह नॉनस्टॉप फ्लाइट पार्टी सुविधा सुरू केली आहे. कबीर मूलचंदानी यांची ही कंपनी दुबईत स्थापन झाली असून, अलीकडेच कंपनी पार्टी ऑन प्लेनसाठी बुकिंग सुरू करण्याचा विचार करत आहे. पार्टी जेटला एक उत्कृष्ट बेडरूम आणि गेस्ट बेल्टही देण्यात आले आहेत.

हॉस्पिटॅलिटी आणि खाजगी विमान वाहतूक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी 5 होल्डिंग्सने फाईव्ह सिग्नेचर लक्झरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कबीर मूलचंदानी यांच्या कंपनी विमान पार्टीबाबत माहिती दिली आहे. विमानात स्पा स्टाईल शॉवरसह किंग साइज बेड आहे, 8 लोकांसाठी डायनिंग टेबल देखील आहे. विमानात सानुकूलित एलईडी लाइटिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच दोन अल्ट्रा लार्ज 55-इंच स्क्रीन देण्यात आल्या आहेत, विमानात होम थिएटरचा उत्तम अनुभव मिळेल.

यासोबतच विमानात नॉनस्टॉप स्ट्रीमिंग आणि हाय स्पीड कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. फाईव्ह स्टाईल नावाच्या विमानातील या पार्टीमध्ये स्मार्ट टेक स्क्रीन्स देण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोक स्वतःच्या आवडीनुसार गोष्टी तात्काळ नियंत्रित करू शकतात.

काय मिळणार सुविधा?

कबीर मूलचंदानी यांच्या पार्टी जेटमध्ये एलईडी लाईट, किंग साइज बेडसह आलिशान बेडरूम अशा सुविधा आहेत. कबीर मूलचंदानी यांची कंपनी लक्झरी पार्ट्या, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी ओळखली जाते.

एक तासाच्या पार्टीसाठी किती रूपये मोजावे लागणार?

विमानात लक्झरी पार्टीसाठी प्रति तास 11-12 लाख रुपये मोजावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT