Zomato And Swiggy  Dainik Gomantak
अर्थविश्व

स्विगी, झोमॅटोवर डॉमिनोज पिझ्झाची डिलिव्हरी होणार बंद, जाणून घ्या काय आहे प्रकरण

दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म खूप जास्त कमिशन घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी सीसीआयकडे तक्रार केली आहे.

दैनिक गोमन्तक

Zomato किंवा Swiggy वरून जर तुम्ही Domino's Pizza ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. डोमिनोज पिझ्झा येत्या काही दिवसांत स्विगी आणि झोमॅटोच्या प्लॅटफॉर्मवरून माघार घेऊ शकतो. रॉयटर्सच्या एका वृत्तात ही माहिती समोर आली आहे. बातमीनुसार, भारतासह इतर अनेक देशांमध्ये डोमिनोज पिझ्झा फ्रँचायझी चालवणाऱ्या जुबिलंट फूड्सने दोन्ही फूड एग्रीगेटर्सवर जास्त कमिशन वसूल केल्याचा आरोप केला आहे.

(Domino's Pizza to stop delivery on Zomato and Swiggy)

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ज्युबिलंट फूड वर्क्सने भारतीय स्पर्धा आयोगाला लिहिलेल्या गोपनीय पत्रात म्हटले आहे की जर स्विगी आणि झोमॅटोने कमिशन आणखी वाढवले ​​तर ते त्यांच्या व्यासपीठावरून माघार घेतील. अधिक कमिशन वसूल केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) दोन्ही प्लॅटफॉर्मविरोधात CCIकडे तक्रार केली होती.

डोमिनोचा ऑनलाइन व्यवसाय

Domino's India च्या मते, त्याच्या एकूण व्यवसायात 27 टक्के ऑर्डर ऑनलाइन येतात. यामध्ये कंपनीच्या स्वतःच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरून मिळालेल्या ऑर्डरचाही समावेश आहे. हे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म 20 ते 30 टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप आहे. जुबिलंट अधिकाऱ्याने सांगितले की, झोमॅटो आणि स्विगीकडून आकारले जाणारे कमिशन डोमिनोज तसेच इतर रेस्टॉरंटसाठी चिंतेचा विषय आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "पुन्हा कमिशन वाढले तर त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल."

एआरएआयच्या तक्रारीवर सीसीआयने जोरदार टिप्पणी केली

सीसीआयने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्स स्विगी आणि झोमॅटोच्या स्पर्धाविरोधी वर्तनासाठी चौकशीचे आदेश दिले होते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर हा आदेश देण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांवर त्यांच्या रेस्टॉरंट भागीदारांसोबत अन्यायकारक व्यवसाय केल्याचा आरोप होता.

सीसीआयने 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, स्विगी आणि झोमॅटोवरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे जसे की पेमेंट सायकलमध्ये विलंब, एकतर्फी कलम आणि कमिशनची आकारणी. सीसीआयने म्हटले आहे की स्विगी आणि झोमॅटो रेस्टॉरंट भागीदारांना त्यांच्या मार्केट शेअर किंवा कमाईच्या हितसंबंधांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व देतात. असे वर्तन अनेक प्रकारे होऊ शकते, ज्यामुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT