Do you know how retail inflation rises | Retail Inflation in Marathi  Dainik Gomantak
अर्थविश्व

किरकोळ महागाई कशी वाढते माहितीये का?

CPI आधारित महागाई किंवा किरकोळ चलनवाढ म्हणजे काय?

दैनिक गोमन्तक

किरकोळ चलनवाढीचा (Retail Inflation) दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांसह आठ महिन्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. तो सलग दुसऱ्या महिन्यात(RBI) पातळीच्या वर राहिला आहे . सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत खाद्यपदार्थांच्या (Food Items) किमतीत झालेली वाढ हे यामागचे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारी 2021 मध्ये 5.03 टक्के आणि या वर्षी जानेवारीमध्ये 6.01 टक्के होती. यापूर्वी जून 2021 मध्ये तो दर 6.26 टक्क्यांच्या उच्चांकावर होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला सरकारने दोन्ही बाजूंनी 2 टक्क्यांच्या फरकाने CPI महागाई 4 टक्के राहील याची खात्री करण्यास सांगितले आहे. (Do you know how retail inflation rises?)

सरकारने जाहीर केलेला घाऊक किंमत निर्देशांकवरील (WPI) आधारित महागाईवरील फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार हा दर 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामागे त्यांनी कच्च्या तेल आणि खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्याचे कारण दिले आहे. मात्र, खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या आहेत.

अन्नधान्याची महागाई वाढली

नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (NSO) ने जारी केलेल्या CPI आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत फेब्रुवारीमध्ये 5.89 टक्के वाढ झाली आहे, जी मागील महिन्यातील 5.43 पेक्षा जास्त आहे.

अन्नधान्यावरील महागाई दर 3.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मांस आणि माशांच्या महागाईचा दर 7.54 टक्के राहिला. तर, अंड्यांच्या भाववाढीचा दर या महिन्यात 4.15 टक्के राहिला आहे. याशिवाय भाजीपाल्याचा महागाई दर 6.13 टक्के आहे. तर मसाल्यांच्या महागाईचा दर 6.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. फळांमध्ये, महागाई दर मागील महिन्याच्या तुलनेत 2.26 टक्क्यांवर स्थिर आहे. तेल आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई जानेवारीत 9.32 टक्क्यांवरून 8.73 टक्क्यांवर आली आहे.

CPI आधारित महागाई म्हणजे काय?

आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण महागाई दराबद्दल बोलतो, तेव्हा निश्चितच ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाईबद्दल बोलले जाते. CPI वस्तू आणि सेवांच्या किरकोळ किमतीतील बदलाचा मागोवा घेते जे कुटुंबे त्यांच्या दैनंदिन वापरासाठी खरेदी करतात. महागाई मोजण्यासाठी CPI मध्ये टक्केवारी वाढीचा अंदाज लावला जातो. अर्थव्यवस्थेत किमती स्थिर राहण्यासाठी आरबीआय या आकडेवारीवर लक्ष ठेवते. सीपीआय एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किरकोळ किमती मोजते. हे ग्रामीण, शहरी आणि संपूर्ण भारताच्या पातळीवर पाहिले जाते. काही कालावधीत किंमत निर्देशांकातील बदलाला CPI आधारित चलनवाढ किंवा किरकोळ चलनवाढ म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT