अनेक दिवसांपासून सरकार (Government) महागाई भत्त्यात (DA) आणखी वाढवू शकते Dainik Gomantak
अर्थविश्व

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; महागाई भत्त्याच्या वाढीला कॅबिनेटची मंजुरी

अनेक दिवसांपासून सरकार (Government) महागाई भत्त्यात आणखी वाढवू शकते,अशी माहिती समोर येत आहे. DA मध्ये आज तीन टक्के वाढ झाली तर DA चा नवीन दर 31 टक्के होईल.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून सरकार महागाई भत्त्यात आणखी वाढवू शकते, अशी माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ आज महागाई भत्ता (DA) वाढीसंदर्भातील प्रस्तावावर कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर्षी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रोखलेला डीए आणि निवृत्ती वेतनधारकांचा डीआर (DR) (महागाई निवारण) वाढवला होता. या वर्षी 1 जुलैपासून पुन्हा महागाई भत्ता जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, महागाईच्या दरात वाढ झाल्यानंतर नवीन निर्देशांकानुसार (एआयसीपीआय इंडेक्स) डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) दर 11 टक्के गुणांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जर आज DA मध्ये तीन टक्के वाढ झाली तर DA चा नवीन दर 31 टक्के होईल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाचा 31 टक्के महागाई भत्ता मिळेल.

सरकारने 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 टक्क्यांनी वाढवला होता. जो त्यावेळी 11 ते 17 टक्के जास्त होता. परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी डीए फक्त 17 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने पूर्वलक्षी पद्धतीने डीए वाढवले, म्हणजे मागील हप्ते वगळता, पुढील हप्त्यांमध्ये ही वाढ लागू करण्यात आली .

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत वर्षातून दोनदा सुधारित केली जाते. जानेवारी आणि जुलैमध्ये यात बदल अपेक्षीत असतो. परंतु कोरोनामुळे, गेल्या तीन हप्त्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, म्हणूनच सरकारने जुलै, 2021 पासून दरात 11 टक्क्यांनी वाढ केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT