Gold And Silver  Dainik Gomantak
अर्थविश्व

Dhanteras: देशात 60,000 कोटींची उलाढाल! धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर 20,000 कोटींच्या सोन्यांची विक्री

₹60,000 Crore Transactions Nationwide: देशभरात आज (29 ऑक्टोबर) धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीस सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.

Manish Jadhav

Goa Diwali: देशभरात आज (29 ऑक्टोबर) धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीस सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या शुभ दिनी देशात लोकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची खरेदी केली. देशभरात किती कोटींची उलाढाल झाली? या संदर्भात माहिती देताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने सांगितले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे 60,000 कोटींची उलाढाल झाली.

25 टन सोने आणि 250 टन चांदीची खरेदी

दरम्यान, चांदणी चौक लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार आणि सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज देशभरात सुमारे 20,000 कोटींचे सोने आणि 2,500 कोटींची चांदीची विक्री झाली आहे. तर दुसरीकडे, सीएआयटीच्या ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे (एआयजेजीएफ) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी एका निवेदनात सांगितले की, सोने आणि चांदीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

अरोरा यांनी सांगितले की, “यावर्षी देशभरात सुमारे 25 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये होती, तर सुमारे 250 टन चांदीचीही विक्री झाली, ज्याची किंमत सुमारे 2,500 कोटी रुपये होती. याशिवाय, जुन्या चांदीच्या नाण्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे, ज्याची किंमत प्रति नाणे 1,200 ते 1,300 रुपये होती.”

दिल्लीत कुठे विक्री झाली?

धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिल्लीतील चांदनी चौक, दरिबा कलान, सदर बाजार, कमला नगर, अशोक विहार, मॉडेल टाऊन, पीतमपुरा, पश्चिम विहार, रोहिणी, राजौरी गार्डन, द्वारका, जनकपुरी यासह काही लोकप्रिय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची विक्री झाली. याशिवाय, साउथ एक्स्टेंशनमध्ये ग्रेटर कैलाश, ग्रीन पार्क, लाजपत नगर, कालकाजी, प्रीत विहार, शाहदरा आणि लक्ष्मी नगर इथेही मोठ्या प्रमाणावर लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली.

धनत्रयोदशीला लोक सोने का खरेदी करतात?

देशात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय, भांडी, झाडू यांसारख्या वस्तूंची खरेदी करणेही शुभ मानले जाते. या दिवशी भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT