Dhanteras Special: Know all about Muhurta trading Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतीय शेअर बाजाराचाची 'मुहूर्त ट्रेडिंग' परंपरा, जाणून घ्या

4 नोव्हेंबर 2021 रोजी, दोन्ही स्टॉक एक्स्चेंज संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान त्यांचा एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग करतील.

दैनिक गोमन्तक

दिवाळी (Diwali) सणानिमित्त बाजार दोन दिवस बंद राहणार असला तरी दिवाळीच्या दिवशी 'मुहूर्त ट्रेडिंग' (Muhurta trading) सत्रासाठी शेअर बाजार (Share Market) तासभर उघडत असतो. दिवाळीला शेअर बाजार बंद असले तरी, दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी 'मुहूर्त ट्रेडिंग' केले जाते आणि या सत्रात सामान्य व्यवहारापूर्वी ब्लॉक डील सत्र असते आणि लागेचच बाजार बंद केला जातो. (Dhanteras Special: Know all about Muhurta trading)

भारतीय शेअर बाजाराची ट्रेडिंगची ही एक प्रतीकात्मकपद्धत आहे जी अनेक वर्षांपासून केला जातो आणि गुंतवणूकदार या दिवशी काही टोकन देखील खरेदी करतात ((Dhanteras Special).

यावर्षी देखील शेअर बाजारात ही 'मुहूर्त ट्रेडिंग' पाळली जाणार आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी, दोन्ही स्टॉक एक्स्चेंज संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान त्यांचा एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग करतील.त्या दिवशी, ब्लॉक डील सत्र 5.45 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 15 मिनिटे चालेल आणि प्री-ओपन सत्र संध्याकाळी 6 ते 6.08 दरम्यान 8 मिनिटे चालेल.विशेष म्हणजे, 'मुहूर्त ट्रेडिंग ' वेळ ज्योतिषशास्त्रानुसार परिभाषित केलेल्या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर आधारित केली जाते.

काय आहे भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व

भारतीय बाजारासाठी मुहूर्त ट्रेडिंग महत्त्वपूर्ण मानले जाते कारण हा मुहूर्त नवीन वर्षाची किंवा 'संवत'ची सुरुवात करतो. या वर्षी, मुहूर्त ट्रेडिंग हिंदू कॅलेंडरनुसार, संवत 2078 ची सुरुवात करेल.दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवात असल्याने, मुहूर्त ट्रेडिंग सत्र उर्वरित वर्षभर समृद्धी आणि पैसा आणणारा मानला जातो.आणि म्हणून याला भारतीय बाजारात अधिक महत्व आहे. हा हूर्त ट्रेडिंग बाजारात BSE वर 1957 मध्ये आणि NSE वर 1992 मध्ये सराव सुरू झाला आहे

दरम्यान या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. 4 नोव्हेंबरला दिवाळी, 5 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. दुसरीकडे 19 नोव्हेंबरला गुरु नानक जयंतीनिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. BSE च्या स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि SLB सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. मात्र, 4 नोव्हेंबर रोजी ट्रेडिंग होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

Samuel Braganza Case: म्हापसा पालिकेच्या प्रशासकांवर गुन्हा दाखल करा! म्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणात 'टुगेदर फॉर म्हापसा' आक्रमक

SCROLL FOR NEXT