Delhi Taxi Permit Validity Dainik Gomantak
अर्थविश्व

Delhi Taxi Permit Validity​: दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, आता सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी 15 वर्षांसाठी वैध!

Delhi: सरकारने CNG आणि इतर क्लीन इंधनावर चालणाऱ्या टॅक्सींच्या परमिटची वैधता 15 वर्षांपर्यंत वाढवली आहे.

Manish Jadhav

Delhi CNG Taxi: दिल्लीतील टॅक्सी चालकांना केजरीवाल सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने CNG आणि इतर क्लीन इंधनावर चालणाऱ्या टॅक्सींच्या परमिटची वैधता 15 वर्षांपर्यंत वाढवली आहे.

या निर्णयामुळे दिल्ली-एनसीआरच्या हजारो टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार आहे. एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

दरम्यान, सरकारने (Government) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे, "दिल्लीतील सर्व टॅक्सी ज्या सीएनजी/क्लीन इंधनावर नोंदणीकृत आहेत, त्यांचा परमिट 15 वर्षांसाठी वैध असेल, जे मोटार वाहन कायदा, 1988, CMVR 1989 आणि DMVR 1993 मध्ये विहित केलेल्या इतर सर्व विहित अटी पूर्ण करतात."

दुसरीकडे, मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 74 अंतर्गत जारी केलेल्या परवान्यांच्या वैधतेच्या संदर्भात असमानता दूर करण्यासाठी अनेक अर्ज प्राप्त झाले.

दिल्ली एनसीआरमध्ये चालणाऱ्या टॅक्सींच्या परवानग्यांबाबत काही संघटना आणि व्यक्तींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने परिवहन विभागाला याचिकाकर्त्याच्या तक्रारींचा विचार करुन आवश्यक आदेश देण्याचे निर्देश दिले होते.

त्याचबरोबर, दिल्ली-एनसीआरमध्ये परिवहन विभागाला असे आढळून आले की, परमिट अंतर्गत चालणाऱ्या विविध श्रेणींच्या टॅक्सींच्या कालावधीत तफावत आहे. सिटी टॅक्सी योजना 2015 अंतर्गत नोंदणीकृत टॅक्सींच्या परमिटची वैधता 8 वर्षे होती, तर इतर श्रेणींच्या टॅक्सींची वैधता 15 वर्षे होती.

दिल्लीचे (Delhi) परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी या संदर्भात विधान केले आहे की, दिल्ली सरकार टॅक्सी चालकांना नेहमीच सहकार्य करत आहे. आता टॅक्सी चालकांना 15 वर्षांसाठी टॅक्सी चालवण्याची सुविधा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT