Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: महागाई भत्त्याबाबत खूशखबर, सरकारने पुन्हा वाढवला DA; कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले!

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. जून महिन्यात तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. जून महिन्यात तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. ओडिशा सरकारने पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली आहे.

यापुढे राज्यातील कर्मचाऱ्यांना 4 टक्के अधिक महागाई भत्ता (DA Hike) मिळणार आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना 38 टक्क्यांऐवजी 42 टक्के डीए मिळेल, असे सरकारने सांगितले आहे. हा वाढीव डीए 1 जानेवारी 2023 पासूनच लागू होईल.

जून महिन्यात थकबाकीचे पैसे मिळतील

दरम्यान, जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत तुम्हाला थकबाकीच्या स्वरुपात पैसे मिळतील. म्हणजेच जून महिन्यात तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

यासोबतच, सरकारने (Government) पेन्शनधारकांनाही 4 टक्के वाढ देऊन महागाईचा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांनाही पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळतील.

मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सरकारी कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांना राज महोत्सवाची भेट दिली आहे. याचा फायदा राज्यातील 4 लाख सरकारी कर्मचारी आणि 3.50 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

याआधी कधी वाढ झाली होती?

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 7.5 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यापूर्वी, एप्रिल 2023 मध्ये ओडिशा सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी, 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

महागाई भत्ता कशाच्या आधारावर वाढतो?

महागाईचा दर लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ केली जाते. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही महागाई भत्त्यात वाढ केली जाते. कामगार ब्युरो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT