Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Crisil: भारतीय कंपन्यांना बसू शकतो झटका, तिसऱ्या तिमाहीच्या नफ्यात मोठी घट?

सलग तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून- 2022) भारतीय कंपन्यांच्या नफ्यात घट होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Crisil Report: सलग तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून- 2022) भारतीय कंपन्यांच्या नफ्यात घट होण्याची शक्यता आहे. क्रिसिल रेटिंगच्या एका युनिटने सोमवारी ही माहिती दिली. वित्तीय सेवा, तेल आणि वायू क्षेत्र वगळता 300 कंपन्यांचे विश्लेषण केल्यानंतर क्रिसिल रिसर्चने हा निष्कर्ष काढला आहे.

2-3 टक्के घसरण होऊ शकते

एजन्सीने म्हटले आहे की, जून तिमाहीसाठी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वर्ष-दर-वर्ष आधारावर 2-3 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. या कालावधीत 47 पैकी निम्म्या क्षेत्रांमध्ये मार्जिन घसरण्याची शक्यता आहे.

वार्षिक आधारावर 30 टक्के वाढ होईल

अहवालात असे म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपन्यांच्या महसुलात (Revenue) वार्षिक 30 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

तिमाही निकालांवर परिणाम

समीक्षाधीन तिमाहीत, भू-राजकीय तणाव आणि भारतीय रुपयाचे विक्रमी अवमूल्यन यामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. याचा परिणाम तिमाही निकालांवर झाला आहे.

ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमधील सर्वात मोठी घसरण

एजन्सीने म्हटले आहे की 'बांधकाम-संबंधित क्षेत्रांमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिटचे मार्जिन सर्वात जास्त 9.90 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यानंतर, गुंतवणुकीशी (Investment) संबंधित विभाग 2.60 टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकतो. दुसरीकडे, ग्राहक विवेकाधीन सेवा आणि उत्पादनांसाठी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तीन टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे प्रामुख्याने सेवांच्या चांगल्या कामगिरीमुळे आहे. याशिवाय टेलिकॉम आणि मीडिया आणि एंटरटेनमेंट (Entertainment) सेगमेंटची कामगिरीही चांगली असेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT