Post Office Saving Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

पोस्टामध्ये 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे खाते काढा आणि दरमहा मिळवा 2500

Post Office Saving Scheme: पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच भारतीयांचे पसंतीचे गुंतवणूक साधन राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Saving Scheme) गुंतवणूक करणे हे नेहमीच भारतीयांचे पसंतीचे गुंतवणूक साधन राहिले आहे. यामध्येही अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासह इतर फायदेही मिळतात. कमी जोखमीसह चांगला नफा मिळविण्यासाठी पोस्ट ऑफिस एमआयएस हा एक उत्तम बचत पर्याय आहे, यामध्ये तुम्ही दर महिन्याला एकदा पैसे गुंतवून व्याजाच्या स्वरूपात याचा लाभ घेऊ शकता. या खात्याचे अनेक फायदे आहेत.

पोस्ट ऑफिस एमआयएस खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील उघडले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे विशेष खाते (Post Office Monthly Income Plan) उघडल्यास, तुम्हाला दरमहा मिळणारे व्याज, तुम्ही ते शिकवणी शुल्कात वापरू शकता किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये वापरू शकता. या योजनेची सर्व माहिती जाणून घेऊया.

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे पोस्ट ऑफिस खाते उघडू शकता.

किमान 1000 रुपये आणि कमाल 4.5 लाख रुपये जमा करता येतात.

या योजनेअंतर्गत व्याज दर (Post Office Monthly Income Plan Interest Rate 2022) 6.6 टक्के एवढा आहे.

जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे खाते त्याच्या नावाने उघडू शकता आणि जर ते कमी असेल तर त्याऐवजी पालक त्यांचे खाते उघडू शकतात.

या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, त्यानंतर ते बंद केले जाऊ शकते.

जर तुमचे मूल 10 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर तुमचे व्याज सध्याच्या 6.6 टक्के दराने 1100 रुपये इतके पाच वर्षांत, हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला एका लहान मुलासाठी 1100 रुपये मिळतील, जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही वापरू शकता. ही रक्कम पालकांना मदतीचा चांगलाच हाथ भार लावू शकते.

या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकल किंवा संयुक्त खाते म्हणून 3 प्रौढांसह उघडता येते. जर तुम्ही या खात्यात 3.50 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दरमहा 1925 रुपये मिळणार. शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ही रक्कम मोठी आहे. या व्याजाच्या पैशातून, तुम्ही शाळेची फी, शिकवणी फी, पेन-कॉपीचा खर्च सहज काढू शकता. या योजनेची कमाल मर्यादा म्हणजे 4.5 लाख जमा केल्यावर, तुम्ही दरमहा 2475 रुपयांचा बंप्पर लाभ घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT