मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन! रेल्वे मंत्रालयाने केले फोटो शेअर

या मार्गावर तयार होत असलेल्या सुरत स्टेशनचे काम डिसेंबर होणार 2024 पर्यंत पूर्ण.
Bullet Train
Bullet TrainDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या सामान्य रुळांवर धावणारी भारतीय रेल्वे लवकरच बुलेट ट्रेनच्या रुळांवर वेग वाढवणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवार, 10 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील सुरत येथे बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनची काही फोटो शेअर केले आहेत. सुरतमध्ये बांधल्या जाणार्‍या बुलेट ट्रेन स्टेशनची छायाचित्रे शेअर करताना, रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, "डायमंड सिटी सुरतमध्ये बनवल्या जाणार्‍या बुलेट ट्रेन स्टेशनचे ग्राफिकल फोटो, डायमंडच्या डिझाईनमध्ये बनवलेले हे बहुमजली स्टेशन सेंट्रलाइज्ड एसी, ऑटोमॅटिक स्टेअरकेस, बिझनेस लाउंज यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल, जे न्यू इंडियाचे एक नवे चित्र सादर करेल."

Bullet Train
IRDAI ने LIC IPO प्रस्तावाला मंजुरी दिली, मसुदा पेपर लवकरच SEBI कडे करणार सादर

सुरत रेल्वे स्टेशन 2024 पर्यंत तयार

रेल्वे मंत्रालयाने (Indian Railway) शेअर केलेल्या सुरत बुलेट ट्रेन स्थानकाची छायाचित्रे आणि माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे की बुलेट ट्रेनच्या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्थानकांना विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई-अहमदाबाद मार्गावर तयार होत असलेल्या सुरत स्टेशनचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. तर इतर स्थानकांच्या तुलनेत या मार्गावर सुरत स्थानक प्रथम तयार होईल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्प असुन, हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) वर सोपवण्यात आली आहे.

508 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 12 स्थानके

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 12 स्थानके असतील. यात साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथे ही स्थानके बांधली जातील. ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर 320 किमी प्रतितास वेगाने धावण्याची योजना आखली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सुरत व्यतिरिक्त, गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या तीन अन्य स्टेशन्स- वापी, बिलीमोरा आणि भरूचचे कामही वेगाने सुरू आहे आणि ही तीन स्टेशन्सही डिसेंबर 2024 पर्यंत तयार होतील.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च 1 लाख कोटी रुपये

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. यापैकी 88 हजार कोटी रुपयांचा निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी देणार आहे. या 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद(Ahmedabad) बुलेट ट्रेन मार्गापैकी 155.76 किमी महाराष्ट्रात,384.04 किमी गुजरातमध्ये आणि 4.3 किमी दादरा आणि नगर हवेलीमध्ये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com