Bounce E scooter Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोलवर चालणारी स्कूटरला इलेक्ट्रिकमध्ये करा रूपांतरित, जाणून घ्या कसे ते

देशात इलेक्ट्रिक वाहनांशी (Electric Scooters) संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे.

दैनिक गोमन्तक

देशात इलेक्ट्रिक वाहनांशी (Electric Scooters) संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे. दरम्यान, बेंगळुरूस्थित काही स्टार्टअपने पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नवीन ई-स्कूटर (E scooter) खरेदी करण्याची गरज नाही.

राईड-शेअरिंग स्टार्टअप कंपनी बाउन्सने (Bounce E scooter) बंगळुरूमध्ये अशीच योजना सुरू केली आहे. कंपनी कोणत्याही पेट्रोल इंजिन स्कूटरला इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी बसवून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये घेते. बाउन्सने आतापर्यंत एक हजाराहून अधिक जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर केले आहे.

अहवालानुसार, कंपनी जुन्या स्कूटरमध्ये एक रेट्रोफिट किट ठेवते ज्यात इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी समाविष्ट असते. स्कूटरमध्ये बसवलेली बॅटरी किट एका चार्जवर 65 किमी पर्यंत चालते. हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित आहे.

बाऊन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हल्लेकरे (Vivekananda Hallekere) म्हणाले की, कंपनीने पायलट प्रोजेक्ट म्हणून जुन्या पारंपरिक स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली आहे. नंतर त्यांना समजले की पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक मोठी बाजारपेठ असू शकते. त्यांची कंपनी या स्कूटर मालकांसाठी सेवा केंद्रे देखील उघडत आहे. बाउन्स नंतर, आता इतर कंपन्यांनी देखील हे काम सुरू केले आहे, ज्यात एट्रियो (Etrio) आणि मेलाडाथ (Meladath) ऑटो कॉम्पोनेंट्सचा समावेश आहे.

मेलाडाथ अशी सोपी हायब्रिड किट लाँच करण्याची तयारी करत आहे, जी कोणत्याही जुन्या पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक हायब्रिड स्कूटरमध्ये सहज रूपांतरित करू शकते. म्हणजेच, जर गरज असेल तर ही स्कूटर पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कोणत्याही मोडमध्ये चालवली जाऊ शकते. यासाठी मेलाडाथ 40 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारेल.

इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याची किंमत

राजीव यांनी सांगितले की ई-स्कूटर तयार करण्यासाठी सुमारे 30 ते 45 हजार रुपये खर्च येतो. हा फरक आहे कारण इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्सचा वापर केला जातो. स्कूटर बनवण्याचा सर्वात मोठा खर्च म्हणजे त्याची मोटर. सध्या दोन प्रकारच्या मोटर्स वापरल्या जात आहेत. मोटरच्या गुणवत्तेनुसार स्कूटरची किंमत बदलते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT