CNG PNG Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

CNG-PNG Price: महागाईत जनतेला मोठा दिलासा, CNG 8 रुपयांनी स्वस्त, PNG चे ही दर घसरले

CNG-PNG Price: गेल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानगर गॅस (MGL) ने मुंबईत CNG च्या किमती प्रति किलो 8 रुपये आणि PNG च्या किमती 5 रुपये/SCM ने कमी केल्या आहेत.

Manish Jadhav

CNG-PNG Price: महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी, गेल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानगर गॅस (MGL) ने मुंबईत CNG च्या किमती प्रति किलो 8 रुपये आणि PNG च्या किमती 5 रुपये/SCM ने कमी केल्या आहेत. महानगर गॅसने आपल्या परवानाधारक क्षेत्रात ही कपात केली आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूसाठी नवीन किंमत प्रणाली जाहीर केल्यानंतर एमजीएलने हे पाऊल उचलले आहे. या घोषणेनंतर सरकारने शुक्रवारी सीएनजी आणि गॅसच्या नवीन दरांची घोषणा केली.

एमजीएलने फेब्रुवारीमध्ये सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात केली होती. असे असूनही, सीएनजीच्या किमती एप्रिल 2022 च्या तुलनेत जवळपास 80 टक्क्यांनी जास्त आहेत.

एमजीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, सीएनजी-पीएनजी ग्राहकांना (Customers) देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीतील कपातीचा लाभ देताना आनंद होत आहे.

या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 8 रुपये आणि पीएनजीच्या दरात 5 रुपये प्रति घनमीटरने कपात करण्यात आली आहे.

मध्यरात्रीपासून लागू होणाऱ्या या निर्णयानंतर सीएनजी 79 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 49 रुपये प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. 1 एप्रिलपासून एपीएम गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT