Chitra Ramakrishna Dainik Gomantak
अर्थविश्व

'...घरचं जेवण मिळणार नाही'; चित्रा रामकृष्ण यांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांना 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हिमालयन योगी असल्याचं सांगणाऱ्या कथित व्यक्तीसोबत माहिती शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 2013 पासून NSE चे प्रमुख असलेल्या चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) (59) यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 24 फेब्रुवारी रोजी बाजारातील हेराफेरी आणि घोटाळ्यांबाबत चौकशी केल्यानंतर अटक केली होती.

वास्तविक, 2018 मध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांनी काही दलालांना फायदा देण्यासाठी निर्णय घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सी आता मार्केट एक्स्चेंजच्या कंप्यूटर सर्व्हरवरुन स्टॉक ब्रोकर्सपर्यंत माहिती लीक झाल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे, ज्याला "सह-स्थान घोटाळा" म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, एजन्सी यापुढे आपली कोठडी मागू शकत नाही, असे सांगत चित्रा रामकृष्ण यांनी जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु सीबीआयने या याचिकेस विरोध केला आहे. त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलयं की, ''त्या एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांचा परदेश प्रवास आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास अद्याप सुरु आहे. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यावे."

तसेच, न्यायालयाने (Court) त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. मात्र घरगुती जेवण आणि इतर सुविधांसाठी त्यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले, "प्रत्येक कैदी सारखाच असतो. कारण ती व्हीआयपी कैदी असू शकत नाही. नियम बदलता येत नाहीत." मात्र, न्यायालयाने त्यांना प्रार्थनापुस्तक, हनुमान चालिसा आणि भगवद्गीतेची पुस्तिका आपल्यासोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे.

शिवाय, दिल्लीतील (Delhi) स्टॉक ब्रोकरच्या विरोधात जवळपास चार वर्षांच्या तपासानंतर रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली होती. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने NSE च्या व्यवस्थापनाने अधिकाराचा गैरवापर केल्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर ही अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT