Unemployment Allowance Dainik Gomantak
अर्थविश्व

Unemployment Allowance: बजेटपूर्वी तरुणांसाठी खूशखबर, 1 एप्रिलपासून सरकार देणार बेरोजगारी भत्ता

Unemployment Allowance In Chhattisgarh: तुम्ही बेरोजगार तरुण असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक दिलासादायक बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Unemployment Allowance In Chhattisgarh: तुम्ही बेरोजगार तरुण असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक दिलासादायक बातमी आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्तीसगड सरकारने तरुणांसाठी बेरोजगारी भत्ता जाहीर केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. बघेल यांनी ट्विट करुन पुढील आर्थिक वर्षापासून हा भत्ता दिला जाईल, असे सांगितले. 2018 च्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने बेरोजगार भत्त्याचे आश्वासन दिले होते.

15 वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली

या निवडणुकीतील आश्वासनाच्या जोरावर काँग्रेस पक्ष 15 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आला. पक्षाच्या वतीने येत्या आर्थिक वर्षापासून बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याला 2500 रुपये बेरोजगार भत्ता जाहीर करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकार (Government) सध्या निकष, रक्कम आणि अर्थसंकल्पीय वाटप यावर काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तसेच, सरकारी अधिकारी सध्या बेरोजगार भत्त्यासाठी राजस्थान मॉडेलचा अभ्यास करत आहेत. राजस्थान सरकार 2019 पासून तरुणांना 'मुख्यमंत्री युवा संबल योजने' अंतर्गत बेरोजगारी भत्ता देत आहे. छत्तीसगडवर (Chhattisgarh) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 26.2% कर्ज आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी मजूर आणि महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजनांची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT