Chanda Kochhar And Deepak Kochhar
Chanda Kochhar And Deepak Kochhar Dainik Gomantak
अर्थविश्व

ICICI Bank Fraud: CBI ची धक्कादायक माहिती! फ्लॅट साडेपाच कोटींचा, खरेदी केला अवघ्या 11 लाखांत; चंदा कोचर यांच्या पतीचा प्रताप

Manish Jadhav

ICICI Bank Loan Fraud Case: आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन मोठा घोटाळा केला. एवढेच नाही तर चुकीच्या मार्गाने 64 कोटी रुपये कमावले.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात तपास यंत्रणेने म्हटले आहे की, चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन ग्रुपच्या अपात्र कंपन्यांना कर्ज दिले. चंदा कोचर यांनी 64 दशलक्ष डॉलर्सची ग्रॅच्युइटी स्वीकारली आणि त्यांच्या कुटुंबाला मुंबईतील चर्चगेट परिसरात व्हिडिओकॉनच्या मालकीच्या फ्लॅटचा हक्क मिळाला.

अवघ्या 11 लाखात फ्लॅट घेतला

दरम्यान, कोचर यांना 2016 मध्ये चर्चगेट येथील सीसीआय चेंबर्समध्ये केवळ 11 लाखात फ्लॅट मिळाल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्यावेळी या फ्लॅटची किंमत 5.3 कोटी रुपये होती. त्यांच्या मुलाने नोव्हेंबर 2021 मध्ये त्याच इमारतीच्या त्याच मजल्यावर 19.11 कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता.

चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक व्हीएन धूत यांच्यावर 3,250 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप आहेत. सीबीआयने मार्चअखेर दाखल केलेल्या 11,000 पानांच्या आरोपपत्रात तिघांचीही नावे होती.

ऑक्टोबर 2018 मध्ये पदावरुन पायउतार

सीबीआयने धूत यांचा पुतण्या, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (VIEL) चे माजी संचालक सौरभ धूत आणि कंपनीचे सीए दत्तात्रय कदम यांनाही आरोपी केले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये, चंदा कोचर यांनी बँकेच्या सीईओ आणि एमडी पदाचा राजीनामा दिला.

कर्जासाठी त्यांनी 'व्हिडिओकॉन ग्रुप'ची बाजू घेतली असा आरोपही करण्यात आला होता. मागील महिन्यात सीबीआयला आयसीआयसीआय बँकेकडून माजी एमडी आणि सीईओवर खटला चालवण्याची परवानगी मिळाली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पहिली सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे.

तसेच 300 कोटींचे मुदत कर्ज दिले

दुसरीकडे, तपासाच्या आधारे सीबीआयचे (CBI) विशेष वकील ए. लेमोजीन यांनी सांगितले की, चंदा कोचर यांनी इतर आरोपींसोबत कट रचला. तसेच व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांसाठी कर्जाची स्वीकृती, हे सर्व तेव्हा घडले जेव्हा समूहाच्या कंपन्या कोणत्याही कर्जासाठी पात्र नव्हत्या.

26 ऑगस्ट 2009 रोजी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ICICI बँकेच्या संचालक समितीने 300 कोटी रुपयांच्या मुदत कर्जासाठी मान्यता दिली होती. चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती.

तसेच, सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, व्हिडिओकॉनने आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून दीपकची कंपनी मेसर्स नूपॉवर रिन्यूएबल लिमिटेड (NRL) मध्ये 64 कोटी रुपये हस्तांतरित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT