Slippers Dainik Gomantak
अर्थविश्व

Slippers: चप्पल घालून दुचाकी चालवत असाल तर सावधान! होऊ शकतो मोठा दंड

Challan For Riding Bike In Slippers: मोटार वाहन चालकांनी वाहतुकीशी संबंधित सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे.

दैनिक गोमन्तक

Challan For Riding Bike In Slippers: मोटार वाहन चालकांनी वाहतुकीशी संबंधित सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे. याचे दोन फायदे होतात, एक म्हणजे सुरक्षित रहदारीचे वातावरण निर्माण होईल. दुसरे म्हणजे, पोलिस तुम्हाला दंड आकारणार नाहीत. अन्यथा, वाहतुकीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, पोलिसांकडून दंड होऊ शकतो. ज्याचा दंड देखील खूप जास्त असू शकतो. याशिवाय काही प्रकरणांमध्ये तुरुंगात देखील जावू लागू शकते. अशा परिस्थितीत दंड होऊ नये यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.

तथापि, काही वाहतूक नियम आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. त्यांना वाटते की, ते सर्व नियमांचे पालन करुन प्रवास करतात. आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहोत हेही त्यांना कळत नाही. मग जेव्हा वाहतूक पोलिस (Police) त्यांना पकडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

चप्पल घालून दुचाकी चालविण्यास मनाई

असाच एक ट्रॅफिक नियम म्हणजे स्लीपर किंवा 'चप्पल' घालून दुचाकी चालवू नका, ज्याबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. वास्तविक, सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, स्लीपर किंवा 'चप्पल' घालून दुचाकी चालविण्यास परवानगी नाही. दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास 1000 रुपये दंड होऊ शकतो.

यासोबतच, दुचाकी किंवा स्कूटर चालवताना पॅन्ट आणि शर्ट किंवा टी-शर्ट घालणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड देखील होऊ शकतो. याशिवाय सामान्य नियमांबद्दल बोलायचे झाल्यास दुचाकीवर हेल्मेट न घातल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो. त्याचबरोबर दुचाकीशी संबंधित कागदपत्रे नसली तरी हजारो रुपयांचा दंड होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT