PM Kisan Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan च्या 13 व्या हप्त्यापूर्वी आली आनंदाची बातमी, सरकार करणार हा मोठा बदल!

PMFBY: सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करणार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल.

दैनिक गोमन्तक

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: अलीकडेच पंजाब सरकारकडून 'प्रधानमंत्री फसल विमा योजने' (PMFBY) ला मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या या योजनेवर आणखी एक मोठी अपडेट आली आहे. कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, 'हवामानाचे संकट आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करणार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल.'

हवामानाच्या आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होतो

2022 मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबमध्ये (Punjab) जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये कमी पाऊस झाल्याने भात, कडधान्ये आणि तेलबिया या पिकांचे नुकसान झाले आहे. अलीकडे हवामानातील अनिश्चिततेच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दुसरीकडे, आहुजा यांनी निवेदनात म्हटले की, 'अशा हवामान आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याने, देशातील असुरक्षित शेतकरी समुदायाचे निसर्गाच्या तडाख्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.'

दुसरीकडे, या परिस्थितीत पीक विम्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातील शेतकऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण देण्यासाठी पीक, ग्रामीण आणि इतर प्रकारच्या कृषी विमा उत्पादनांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, "केंद्रीय कृषी आणि शेतकरी (Farmer) कल्याण मंत्रालय अलीकडील हवामान संकट आणि वेगवान तांत्रिक विकासाला प्रतिसाद म्हणून PMFBY मध्ये शेतकरी समर्थक बदल करण्यासाठी सज्ज आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT