PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, 'या' योजनेची पाच वर्षांसाठी वाढवली मुदत!

Pradhanmantri Garib Kalyan Ann Yojana: अंत्योदय कुटुंबांना दरमहा 35 किलो मोफत धान्य मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा सुमारे 81 कोटी लोकांना फायदा होणार आहे.

Manish Jadhav

Pradhanmantri Garib Kalyan Ann Yojana: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना दरमहा पाच किलो धान्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. अंत्योदय कुटुंबांना दरमहा 35 किलो मोफत धान्य मिळणार आहे.

केंद्राच्या या निर्णयाचा सुमारे 81 कोटी लोकांना फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकार या योजनेवर पुढील पाच वर्षांत 11.80 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

'13 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले'

ठाकूर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत सुमारे 13.50 कोटी लोक गरिबीच्या पातळीच्या वर आले आहेत. मोदी सरकारचे (Government) हे मोठे यश आहे. ठाकूर पुढे म्हणाले की, कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणण्यात आली होती.

आता ही योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 2020 मध्ये महामारीच्या काळात दिलासा देण्यासाठी लागू करण्यात आली होती.

यातर्गंत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो धान्य मोफत वाटप करण्याची तरतूद करण्यात आली होती. हा दिलासा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वितरित करण्यात आलेल्या पाच किलो धान्याच्या तरतुदीपेक्षा वेगळा होता.

महिला गटांना ड्रोन देण्याची योजना

यासोबतच, 15,000 महिला बचत गटांना ड्रोन (Drone) पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यातर्गंत दोन वर्षांत 1261 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेचे उद्दिष्ट 2024-25 ते 2025-26 या कालावधीत 15000 महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करुन देणे आहे, जेणेकरुन ते शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी भाडेतत्वावर ड्रोन सेवा देऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT