8th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; 3 टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?

8th Pay Commission Latest Update: एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

8th Pay Commission Latest Update: एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकार जुलै 2026 पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये 3 टक्क्यांची वाढ करु शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या संभाव्य वाढीनंतर एकूण महागाई भत्ता 60 टक्क्यांवरुन 63 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात मोठी वाढ पाहायला मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे.

महागाई भत्त्याचे निर्धारण कामगार मंत्रालयाद्वारे जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या किरकोळ महागाईच्या गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असते. यापूर्वी, सरकारने जानेवारी 2026 मध्ये महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची मोठी वाढ केली होती, ज्यामुळे डीए 53 टक्क्यांवरुन 60 टक्क्यांवर पोहोचला होता. आता पुन्हा एकदा 3 टक्क्यांची वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या 'टेक-होम' पगारात समाधानकारक वाढ होईल. त्याचप्रमाणे महागाई सवलतीतही समान प्रमाणात वाढ होणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या हातात अधिक पैसे येतील.

साधारणपणे, केंद्र सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास या वाढीची अधिकृत घोषणा करते. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होत असल्याने कर्मचाऱ्यांना (Employees) जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी (एरियर) देखील दिली जाते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याने घरभाडे भत्ता सारख्या इतर भत्त्यांमध्ये यापूर्वीच वाढ झाली आहे. दरम्यान, महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून दीर्घकाळापासून केली जात असली, तरी सध्या तरी हा भत्ता 63 टक्क्यांपर्यंत वाढण्याचेच स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT