Car Export in India Dainik Gomantak
अर्थविश्व

Car Export in India: हम भी किसी से कम नहीं...! या 'Indian Cars' ला विदेशातही डिमांड

भारतीय कार्संनी विदेशातही लोकप्रियचा मिळवली आहे. या कार्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Car Export in India: भारतीय कार्संनी विदेशातही लोकप्रियचा मिळवली आहे. कारण भारतात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात कार विकल्या जातात, यासोबतच भारतात बनवलेल्या कारला देशातच नाही तर विदेशातही मोठी डिमांड आहे. पण वाढत्या महागाईमुळे प्रत्येक देशातील कार बाजारावर परिणाम झाला आहे.

याच कारणामुळे गेल्या महिनाभरात वाहनांच्या निर्यातीत घट झाली आहे. मे 2023 मध्ये एकूण 53,237 प्रवासी वाहनांची निर्यात 6.42 टक्क्यांनी कमी झाली. टॉप 10 सर्वाधिक निर्यात झालेल्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या कारने कंपनीच्या काही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सला मागे टाकून पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

  • मारुती एस प्रेसो

गेल्या महिन्यात मारुती एस प्रेसोची सर्वाधिक निर्यात झाली आहे. यादरम्यान त्यातील 5925 युनिट्स परदेशात निर्यात करण्यात आली. तर गेल्या वर्षी मे महिन्यात या कारची 3692 युनिट्सची निर्यात झाली. म्हणजेच निर्यातीत 60 टक्के वाढ झाली आहे. भारतात या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.2 लाख रुपये आहे. 

  • Hyundai Xcent

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Hyundai Xcent कार आहे.  या कारच्या 5,198 युनिट्सची निर्यात झाली असून मारुती बलेनो 4,910 युनिट्ससह तिसऱ्या स्थानावर आणि मारुती सेलेरियो 3,413 युनिट्ससह चौथ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सेलेरियोच्या निर्यातीत 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • फोक्सवॅगन व्हरटस

फोक्सवॅगन व्हरटस मे 2023 मध्ये सर्वाधिक निर्यातीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. त्याची 3,099 युनिट्स निर्यात झाली असून मारुती सुझुकी डिझायर सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत किआ सॉनेट सातव्या स्थानावर आहे, तर मारुती एर्टिगा आठव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, मारुती स्विफ्ट नवव्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT