Mutual fund  Dainik Gomantak
अर्थविश्व

दररोज 20 रुपयांची गुंतवणुक, 480 महिन्यांनी मिळतील 10 कोटी

गुंतवणुकीच्या दिशेने पावले उचलण्याची गरज

दैनिक गोमन्तक

नवीन वर्ष येणार आहे, या जुन्या वर्षातून खूप काही शिकायला मिळाले. जर तुम्हाला 2021 हे वर्ष संस्मरणीय बनवायचे असेल, तर जाता जाता असे काम करा, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात अभिमान वाटेल.

आजच्या काळात प्रत्येकाची श्रीमंत व्हायची इच्छा आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी पावले उचलाल. दररोज किंवा दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक (investment) करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. अनेकदा लोक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यांचे एकच उत्तर असते, प्रत्यक्षात तसे होत नाही. पण हा त्यांचा भ्रम आहे.

तुम्हाला 480 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल, दररोज 20 रुपये जोडून तुम्ही करोडपती होऊ शकता. दिवसाला 20 रुपये गुंतवून तुम्ही 10 कोटी रुपये उभे करू शकता. हे अगदी शक्य आहे, तुम्हाला फक्त गुंतवणुकीच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे.

तुम्हाला म्युच्युअल फंडाविषयी माहिती असेलच. यामध्ये दर महिन्याला गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (plan) (SIP) द्वारे दरमहा म्युच्युअल फंडात किमान रु 500 गुंतवू शकता. म्युच्युअल फंडांनी गेल्या 25 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. काही फंडांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 20 रुपयांच्या रोजच्या गुंतवणुकीसह 1 कोटी रुपये कसे कमवू शकता? वास्तविक, जर 20 वर्षांच्या तरुणाने दररोज 20 रुपये वाचवले तर ही रक्कम एका महिन्यात 600 रुपये होईल.

त्यानंतर ही रक्कम म्युच्युअल फंडात एसआयपी करा. आजच्या घडीला एक दिवसाला 20 रुपये वाचवता येतात, ही खूप कमी रक्कम आहे. गुंतवणूक 40 वर्षे चालू ठेवावी लागेल. म्हणजेच (480 महिने) दरमहा 600 रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणुकीवर 15% च्या सरासरी वार्षिक परताव्यासह, तुम्हाला 40 वर्षांनंतर एकूण रु. 1.88 कोटी मिळतील. या 40 वर्षांमध्ये तुम्हाला फक्त 2,88,00 रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, महिन्याला 600 रुपयांच्या SIP वर 20 टक्के परतावा मिळत असेल, तर 40 वर्षांनंतर एकूण 10.21 कोटी रुपये जमा होतील.

जर 20 वर्षांच्या तरुणाने दररोज 30 रुपये वाचवले, जे एका महिन्यात 900 रुपये होतील. तुम्ही ही रक्कम एसआयपीच्या माध्यमातून कोणत्याही विविध म्युच्युअल फंडात गुंतवल्यास, या गुंतवणुकीवर 40 वर्षांनंतर तुम्हाला वार्षिक केवळ 12 टक्के परतावा दराने 1.07 कोटी रुपये मिळतील. या दरम्यान 4,32,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीत, चक्रवाढ व्याज लहान गुंतवणूक खूप मोठी करते. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT