Union Finance Minister Nirmala Sitharaman Twitter/ @ani_digital
अर्थविश्व

Union Budget 2023: पीएम आवास योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा, अर्थमंत्री म्हणाल्या...!

PM Awas Yojana Budget: 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Awas Yojana Budget: 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सरकारने अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत वाढ करण्याची घोषणा केली.

केंद्र सरकारच्या या योजनेतील लोकांना घर बांधण्यासाठी सबसिडी दिली जाते. त्यात आता पुन्हा एकदा सरकारने बजेट वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा अशा लोकांना होईल, ज्यांचे घर अद्याप बांधले गेले नाही किंवा ते घर बांधण्याचा विचार करत आहेत.

अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संघटित झाली

तत्पूर्वी, अर्थमंत्र्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संघटित झाली आहे. भारत (India) जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. दरडोई उत्पन्नही दुपटीने वाढले आहे. 2.2 लाख कोटी रुपये 11.4 कोटी शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात आले आहेत.'

पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जा

  • वेबसाइटच्या वर तुम्हाला 'सिटिझन असेसमेंट'चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्या मुक्कामानुसार पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल.

  • या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.

  • अर्ज भरल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण माहिती वाचा. तुमचे समाधान झाल्यानंतर सबमिट करा.

  • सबमिट केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक प्रदर्शित होईल. त्याची प्रिंट काढा आणि भविष्यासाठी जतन करा.

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे घर नाही अशा व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी 2.50 लाखांची मदत दिली जाते. यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. पहिला हप्ता 50 हजार. 1.50 लाखांचा दुसरा हप्ता. तर तिसरा हप्ता 50 हजारांसाठी दिला जातो. राज्य सरकार एकूण 2.50 लाख रुपयांपैकी 1 लाख देते. त्याचबरोबर केंद्र सरकार (Central Government) 1.50 लाख अनुदान देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT