RS 2000 Notes Withdraw Dainik Gomantak
अर्थविश्व

2000 हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट, सरकारने एक्सचेंजची तारीख वाढवली; पण त्यानंतर काय?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून 2000 च्या नोटेबाबत एक मोठी अपडेट आली आहे.

Manish Jadhav

Breaking from RBI 2000 Note Exchange Date Increases To 7 October: आज सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील अशा लोकांना मोठा दिलासा दिला आहे, जे आतापर्यंत चलनातून बाद झालेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकत नव्हते.

RBI ने आता त्याची मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. विशेष म्हणजे, हे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. हा कालावधी आज संपत होता. मात्र, याआधीच आरबीआयने लोकांना आणखी 7 दिवसांची मुदत दिली आहे.

2000 हजाराच्या नोटा 7 ऑक्टोबरपर्यंत बदलता किंवा जमा करता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की, बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचा कालावधी संपला आहे. यासोबतच पुनरावलोकनाच्या आधारे बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते बँकेत (Bank) जमा करु शकतात किंवा 7 ऑक्टोबरपर्यंत बदलून घेऊ शकतात.

2000 रुपयांच्या नोटा 19 मे पासून बदलण्यास सुरुवात झाली

दरम्यान, 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून ठेवण्याची आणि जमा करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती.

एकावेळी फक्त 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील, असेही सांगितले. यानंतर, शनिवारी आरबीआयने (RBI) अपडेट दिली की, आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा बदलून किंवा बँकांमध्ये जमा करता येतील.

इतक्या नोटा आल्या

RBI ने सांगितले की, 19 मे पर्यंत चलनात असलेल्या एकूण ₹3.56 लाख कोटींपैकी ₹3.42 लाख कोटी किमतीच्या ₹2000 च्या नोटा परत आल्या आहेत. यामुळे 29 सप्टेंबरपर्यंत केवळ ₹ 2000 च्या 0.14 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत ज्या अद्याप बँकांमध्ये परत आलेल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT