PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisanच्या हप्त्याआधी शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने आजच दिली 'ही' खूशखबर!

Subsidy On Seeds In Bihar: पीएम किसान सन्मान निधीसाठी पात्र असलेले करोडो शेतकरी 13 वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Subsidy On Seeds In Bihar: पीएम किसान सन्मान निधीसाठी पात्र असलेले करोडो शेतकरी 13 वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरे तर, सप्टेंबरमध्ये पीएम किसानचा 12 वा हप्ता सरकारने हस्तांतरित केला होता. 13 वा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान मिळणार आहे. 13 व्या हप्त्याची रक्कम 26 जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल, असा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र याआधीच बिहारच्या नितीश सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे.

ट्विटद्वारे माहिती दिली

योजनेनुसार, अर्धा एकर जमिनीसाठी भात आणि गव्हाच्या बियाणांच्या किमतीवर 90 टक्के किंवा कमाल 40 रुपये प्रति किलो अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर चतुर्थांश एकर जमिनीवरील कडधान्य पिकासाठी बियाणांच्या किमतीवर प्रतिकिलो 108 रुपये अनुदान देण्याची योजना आहे. बिहार (Bihar) सरकारने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

धान आणि गहू सवलतीच्या दरात मिळतील

मुख्यमंत्री बीज विस्तार योजनेंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांना भात आणि गव्हाचे बियाणे सवलतीच्या दरात दिले जातील. योजनेतील शेतकऱ्यांची निवड पात्रतेच्या आधारे केली जाईल. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. योजनेशी संबंधित अधिक माहिती 18001801551 या क्रमांकावर मिळू शकते. तसेच, नितीश सरकारच्या (Government) या फायदेशीर योजनेत कोणताही शेतकरी बांधव निवडला जाईल. विशेष म्हणजे, त्याला दोन प्रकारे फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT