Bank Holidays: banks are closed for 6 days in next week Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays: पुढील आठवड्यात सहा दिवस बँका बंद

पुढील आठवड्यात 7 पैकी 6 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही (Bank Holiday)

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला पुढील आठवड्यात बँकेशी (Bank) संबंधित कोणतेही काम असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या दिवसात बँका अनेक दिवस काम करत नाहीत, त्यामुळे दर आठवड्याला बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासावी, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. पुढील आठवड्यात 7 पैकी 6 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही (Bank Holiday). कृपया लक्षात घ्या की या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून दर महिन्याला रिझर्व्ह बँकेकडून बँक सुट्ट्यांची यादी जारी केली जाते.(Bank Holidays: banks are closed for 6 days in next week)

18 ऑक्टोबर- आसामच्या गुवाहाटीमध्ये काटी बिहू उत्सवामुळे 18 ऑक्टोबर रोजी बँका काम करणार नाहीत.

19 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद 19 ऑक्टोबर रोजी आहे, यामुळे बँका बंद राहतील. या दिवशी नवी दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, बेलापूर, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, कानपूर, कोची येथे बँका बंद राहतील. लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकिंग ऑपरेशन्स होणार नाहीत.

20 ऑक्टोबर-वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळुरू, चंदीगड, शिमला, कोलकाता आणि आगरतळा येथे 20 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.

22 ऑक्टोबर- 22 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

23 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील.

24 ऑक्टोबर रोजी रविवारमुळे देशभरातील बँका काम करणार नाहीत.

दरम्यान ऑक्टोबर महिन्याचा विचार करता यापूर्वीही बँकांना अनेक सुट्ट्या मिळाल्या होत्या. 1 ऑक्टोबर रोजी गंगटोकमधील अर्धवार्षिक बँक बंद खाते असल्यामुळे काम झाले नाही. याशिवाय 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीमुळे सर्व राज्यांमध्ये बँका बंद होत्या.याशिवाय 3 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँकांमध्ये काम झाले नव्हते. 6 ऑक्टोबर रोजी महालय अमावस्या - अगरतळा, बंगळुरू आणि कोलकाता येथे बँका बंद होत्या. लिनिंगथौ सनमी- इम्फालच्या मीरा चाओरेन हौबा येथे 7 ऑक्टोबर रोजी बँका बंद होत्या. 9 ऑक्टोबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि 10 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँकेत कोणतेही काम झाले नव्हते.

बँक सुट्ट्यांविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक राज्याच्या बँक सुट्ट्यांची माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT