auto news maruti suzuki soon to launch two new affordable cars in india  Dainik Gomantak
अर्थविश्व

स्वस्त गाडी घेण्याचा करताय विचार, मग वाचा ही बातमी

कंपनी करणार 6 कार लॉन्च

दैनिक गोमन्तक

भारतात सर्वाधिक गाड्या विकणारी मारुती सुझुकी लवकरच ग्राहकांच्या बजेटमध्ये दोन नवीन छोट्या आकाराच्या कार आणणार आहे. 2022 मध्ये, कंपनी अनेक नवीन आणि अपडेटेड वाहने लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनी दर तीन महिन्यांनी 6 कार लॉन्च करणार आहे. यामध्ये दोन लहान आकाराच्या मारुती सुझुकी इग्निस आणि मारुती सुझुकी एस-प्रेसोचाही समावेश आहे. स्पर्धा आणि ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी अनेक वैशिष्ट्यांसह कमी किमतीत कार लॉन्च करणार आहे. या दोन कारबद्दल अधिक वाचा.

मारुती सुझुकी एस-प्रेसो ड्युअलजेट

मारुती सुझुकी लवकरच एस-प्रेसो ला नवीन ड्युअलजेट इंजिनसह लॉन्च करू शकते जे अलीकडे सेलेरियोला देण्यात आले आहे. सध्या, 1.0-लीटर K10B पेट्रोल इंजिन या मायक्रो SUV सोबत दिले जात आहे, जे 68 HP पॉवर बनवते. या इंजिनाऐवजी कंपनी नवीन मॉडेलमध्ये (Model) 1.0-लिटर K10C ड्युअलजेट इंजिन देणार आहे. याचा सरळ अर्थ असा की नवीन एस-प्रेसो ही इंधनाच्या बाबतीतही मजबूत कार असेल. याशिवाय कारला फ्रेश लुक देण्यासाठी काही कॉस्मेटिक बदल देखील केले जाऊ शकतात.

मारुती सुझुकी इग्निस ड्युअलजेट

कंपनीच्या या छोट्या आकाराच्या कारला ग्राहकांमध्ये खूप पसंती मिळत असून कंपनी नवीन इंजिनसह कारचे नवीन मॉडेल आणणार आहे. सध्याच्या इग्निसमध्ये 1.2-लिटर K12M इंजिन दिले जात आहे जे 83 HP पॉवर बनवते. आता या इंजिनला 1.2-लिटर K12N इंजिन दिले जाऊ शकते जे 90 हॉर्सपॉवर बनवते आणि हे इंजिन ड्युअलजेट तंत्रज्ञानासह येते. नवीन इग्निस सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक पेट्रोलची (petrol) बचत करेल आणि काही कॉस्मेटिक बदल देखील पाहू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT