ATM Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

ATM Rules: ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' सरकारी बँकेच्या नियमात मोठा बदल

तुमचे देखील या सरकारी बॅंकेत खाते आहे का?

दैनिक गोमन्तक

तुमचे जर सरकारी बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. बँकेने एटीएम ट्रांजेक्शनशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. कॅनरा बँकेने(Canara Bank) ग्राहकांसाठी नवे नियम जारी केले आहेत. तुम्हीही एटीएम किंवा कार्डद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्या की कोणते नियम बदलले आहेत.

कॅनरा बँकेने तत्काळ प्रभावाने लागू केलेल्या नियमांमुळे एटीएम कॅश (ATM Cash) , पीओसी (PCO) तसेच ई-कॉमर्स दैनंदिन ट्रांजेक्शनसाठी मर्यादा वाढवली आहे. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की, नवीन नियम तात्काळ लागू झाले आहेत.

आता लिमिट किती आहे?

रिझव्‍‌र्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार कार्ड व्यवहारांची सुरक्षाही बँकेने वाढवली आहे. बँकेने (Bank) क्लासिक डेबिट कार्डची एटीएम ट्रांजेक्शनची लिमिट 40,000 वरून 75,000 प्रतिदिन केली आहे.

पीओएस कॅप देखील वाढली

याशिवाय, या कार्ड्ससाठी दैनिक पीसीओ कॅप 1 लाख वरून 2 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, जर तुम्ही क्लासिक डेबिट कार्डद्वारे एनसीएफसाठी दैनंदिन ट्रांजेक्शन मर्यादा रु. 25,000 ठेवण्याचा निर्णय घेतला असेल. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

लिमिट 2 रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढली

जर आपण प्लॅटिनम/बिझनेस/सिलेक्ट डेबिट कार्डबद्दल सांगायचे झाले तर कॅश ट्रांजेक्शन लिमिट देखील वाढवण्यात आली आहे. ती 50 हजारांवरून 1 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, त्याच्या POS साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

SCROLL FOR NEXT