As soon as Air India comes in the hands of Tata, these banks are in queue

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

एअर इंडिया टाटांच्या हाती येताच 'या' बँकांनी लावल्या रांगा

एअर इंडियाचा लिलाव हा या वर्षातील सर्वात मोठ्या व्यावसायिक सौद्यांपैकी एक आहे.

दैनिक गोमन्तक

एअर इंडियाचा लिलाव हा या वर्षातील सर्वात मोठ्या व्यावसायिक सौद्यांपैकी एक आहे. एअर इंडिया महिनाभरात टाटा समूहाच्या ताब्यात येईल. त्याचा परिणाम आता बँकिंग कर्जावरही दिसून येत आहे. एअर इंडियाच्या (Air India) विद्यमान कर्जदारांनी आता टाटा (Tata Group) संबंधित कंपनीला 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देऊ केले आहे, जे सरकारी मालकीच्या एअरलाइनवर नियंत्रण ठेवणार आहे.

खूप कमी व्याज

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांनी टाटा सन्सशी संबंधित टॅलेसला 35 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. हे कर्ज देखील फक्त 4.25 टक्के भारित सरासरी उत्पन्नावर देण्यात आले आहे.

खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया टॅलेसच्या ताब्यात येईल. टाटा सन्स ही टॅलेसची प्रवर्तक आहे. टालेसने एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांना सर्वसाधारण कारणासाठी 23 हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी एका वर्षासाठी बोली लावण्यास सांगितले होते. या बोली निमंत्रणानंतर बँकांनी ही ऑफर सादर केली आहे. एअर इंडियाच्या कर्जासाठी 18,000 कोटी रुपये आणि प्रारंभिक परिचालन खर्चासाठी 5 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे कंपनीने सांगितले होते.

बँकांची ही ऑफर टाटांची विश्वासार्हता दर्शवते

बँकांची ही ऑफर टाटा समूहाची विश्वासार्हता दर्शवते. एअर इंडिया आर्थिक अडचणीत होती आणि त्यामुळे सरकारला त्याचे खाजगीकरण करावे लागले. आता टाटांच्या हाती एअर इंडिया जाताच बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, संबंधित बँकांनी टाटा समूहाच्या कंपनीला कोणतेही तारण न ठेवता विनारेटेड कर्ज देण्याचा विशेष ठराव पास केला. MCLR पेक्षा कमी व्याजावर कर्ज देण्यासाठी असा ठराव आवश्यक आहे.

या बँकांनी ऑफर दिल्या आहेत

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ज्या बँकांनी टाटाच्या कंपनीला स्वस्त कर्ज देऊ केले आहे त्यात एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या बँकांनी 3 हजार कोटी रुपयांपासून 12 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ केले आहे. गंमत म्हणजे हा अहवाल खरा ठरला तर टाटाला एअर इंडियाचे जुने कर्ज फेडण्यासाठी जे नवीन कर्ज मिळणार आहे, त्याचा व्याजदर पूर्वीपेक्षा खूपच कमी असेल.

यावर्षी झालेल्या लिलावात टाटा समूहाच्या टॅलेसने 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, जी सर्वात मोठी ठरली. या 18,000 कोटी रुपयांपैकी 15,300 कोटी रुपये एअर इंडियाच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तर 2,700 कोटी रुपये सरकारला रोख स्वरूपात द्यायचे आहेत. एअर इंडियाच्या जुन्या कर्जावर बँका 9 ते 10 टक्के व्याज आकारत आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही बँकेने किंवा टाटा समूहाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT