Anil Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात; रिलायन्स पॉवर, इन्फ्राच्या संचालकपदावरुन पायउतार

अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी, सेबीने अनिल अंबानी (Anil Ambani) यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये सामील होण्यास मनाई केली होती. सेबीच्या या आदेशानंतर त्यांनी आता स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या त्यांच्या समूहातील या दोन कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. (Anil Ambani resigns as director of Reliance Power Reliance Infra)

"सेबीच्या (SEBI) अंतरिम आदेशानंतर गैर-कार्यकारी संचालक अनिल धीरुभाई अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदावरुन पायउतार झाले आहेत," असे रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून स्टॉक एक्सचेंजला असेही सांगण्यात आले की, ''अनिल अंबानी यांनी "सेबीच्या अंतरिम आदेशानुसार" कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या सर्व संचालकांना शेअर बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या संचालकांच्या पदांचा तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. तसेच, फसव्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरुन या सर्वांना सिक्योरिटी मार्केटमध्ये सहभागी होण्यास देखील बंदी घातली होती.

शिवाय, रिलायन्स-पॉवर आणि रिलायन्स-इन्फ्रा यांच्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांची पाच वर्षांच्या मुदतीसाठी अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली, असे अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या (ADAG) दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे. मात्र, सर्वसाधारण सभेत या नियुक्तीवर सदस्यांची मंजुरी घेणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT