Anil Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Anil Ambani: LIC ला मोठा झटका, अनिल अंबानींच्या कंपनीत बुडणार 3,400 कोटी रुपये!

LIC: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीत एलआयसीचा पैसा बुडू शकतो.

दैनिक गोमन्तक

Anil Ambani: कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीत एलआयसीचा पैसा बुडू शकतो. LIC चे रिलायन्स कॅपिटल (RCap) वर 3,400 कोटी रुपयांचे कर्ज आहे, त्यापैकी फक्त 782 कोटी रुपये मिळू शकतात. म्हणजे, उरलेली रक्कम बुडू शकते.

एलआयसीचे पैसे बुडणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलआयसीने आरसीएपीमधील कर्ज विकण्यासाठी स्विस चॅलेंजचा अवलंब केला होता. स्ट्रेस्ड असेट फर्म ACRE SSG चे हे कर्ज खरेदी करु शकते, परंतु यासाठी LIC ला मोठी किंमत मोजावी लागेल. ACRE SSG ने LIC चे कर्ज 73% च्या सवलतीसह विकत घेण्याची ऑफर दिली आहे.

दुसरीकडे, स्विस चॅलेंज बिडिंगमध्ये, कोणीही असेटसाठी बोली लावू शकतो. त्याचे तपशील सार्वजनिक केले जातात, इतर लोक बोली लावतात. जर कोणत्याही पक्षाने जास्त बोली लावली तर मूळ कॉन्ट्रक्टरला तेवढ्याच रकमेची बोली लावण्याची संधी दिली जाते, ही बाब वेगळी आहे.

मूल्यांकनावर प्रश्न

ACRE SSG च्या ऑफरवर आधारित, रिलायन्स कॅपिटलचे मूल्य सुमारे 4,400 कोटी रुपये आहे. LIC आणि ACRE SSG हे दोघेही रिलायन्स कॅपिटलच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सचे सदस्य आहेत. एकीकडे ACRE कंपनीवर 1350 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

20 वित्तीय सेवा कंपन्या

विशेष म्हणजे, रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे 20 वित्तीय सेवा कंपन्या आहेत, ज्यात सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. RBI ने 30 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडलेल्या रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले होते आणि त्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT