Cyber ​​Criminals Dainik Gomantak
अर्थविश्व

एक SMS अन् तुमचे बँक खाते रिकामे! टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

कोरोना काळात लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन (Smartphone) आणि लॅपटॉपवर घालवत आहेत. अशा स्थितीत सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर घालवत आहेत. अशा स्थितीत सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत. गेल्या काही काळात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामध्ये, गुन्हेगार वेगलवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करुन तुमचे बँक खाते (Bank Account) काही मिनिटांत रिकामे करतात. यापैकी एक पद्धत म्हणजे वेबसाइट स्मिशिंग. (An SMS Can Empty Your Bank Account)

स्मिशिंग म्हणजे काय?

यात एसएमएस (SMS) आणि फिशिंग दोन्ही गोष्टी समाविष्ट आहेत. देशभरातील लोकांना त्यांचे खाते अपडेट करणे किंवा नवीन प्रोग्रामसाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचा दावा करणारे संदेश मिळत आहेत. मेसेजमध्ये लिंक्स आणि टोल-फ्री क्रमांक वापरण्यात येत आहेत.

या गोष्टींचे अनुसरण करा

  • सर्वप्रथम, हे लक्षात ठेवा की सेल फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. म्हणूनच अनोळखी व्यक्तीच्या लिंकवर कधीही क्लिक करु नका.

  • तसेच, ईमेल किंवा मजकूर संदेश किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेली कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती कधीही शेअर करु नका.

  • तसेच बँकेला संशयास्पद ईमेल्सची माहिती द्या ज्यामध्ये त्यांचे नाव किंवा लोगो वापरला गेला आहे.

  • फसवणूक किंवा खात्यात अनधिकृत प्रवेश शोधण्यासाठी तुमचे खाते नियमितपणे तपासा.

  • लक्षात ठेवा की, बँक तुमची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी कधीही एसएमएस पाठवत नाही. जर तुम्हाला तुमचा इंटरनेट बँकिंग सुरक्षा तपशील जसे की ईमेलमध्ये पिन, पासवर्ड किंवा खाते क्रमांक विचारला गेला तर त्याला प्रतिसाद देऊ नका.

दरम्यान, वेबसाइट स्पूफिंग ही देखील बँक फसवणुकीची एक पद्धत आहे, ज्याच्याशी संबंधित प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. वेबसाइट स्पूफिंगमध्ये बनावट वेबसाइट तयार करुन, गुन्हेगार त्याच्या मदतीने आपली फसवणूक करु शकतो. या बनावट वेबसाइट्स खऱ्या दिसण्यासाठी गुन्हेगार मूळ वेबसाइटचे नाव, लोगो, ग्राफिक्स आणि कोडही वापरतात. तसेच ते बनावट URL देखील तयार करु शकतात, जे ब्राउझर विंडोच्या शीर्षस्थानी अॅड्रेस फील्डमध्ये दिसतात. यासह, ते तळाशी उजवीकडे दिलेला पॅडलॉक चिन्ह देखील कॉपी करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT