Amazon Layoffs: कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. ट्विटर आणि मेटा नंतर जगातील सर्वात मोठी कंपनी Amazon ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मंदीमुळे जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. Amazon ने 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.
कंपनीचे सीईओ अँडी जेस्सी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अँडी जेस्सीच्या वतीने एक नोटीस जारी करुन सांगण्यात आले आहे की, कंपनी 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. त्याचवेळी, यापूर्वी कंपनीने 10,000 कर्मचार्यांच्या (Employees) बाहेर पडण्याबद्दल सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोकरीतील कपात Amazon च्या डिव्हाइस युनिटवर केंद्रित असेल, ज्यामध्ये व्हॉईस-असिस्टंट अलेक्सा आणि त्याच्या रिटेल आणि मानव संसाधन विभागांचा समावेश आहे.
जागतिक बाजारपेठेत आलेल्या मंदीमुळे आयटी कंपन्यांवर संकट कोसळले आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरअखेर 15 लाख कर्मचारी कंपनीशी जोडले गेले होते. अॅमेझॉनच्या वाढीमध्ये झपाट्याने घट होत आहे, त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागू शकतो.
वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, अॅमेझॉनने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना कामावर घेतले होते, परंतु आता हा निर्णय कंपनीवर बोजा ठरत आहे. मंदीमुळे कंपनीच्या वाढीमध्ये लक्षणीय घट होत आहे. या कारणास्तव, कंपनीने टाळेबंदी जाहीर केली आहे. Amazon व्यतिरिक्त, Salesforce Inc ने देखील 10 टक्के कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.