Mukesh Ambani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Reliance Jioला आकाश अंबानीच्या रूपात मिळाले नवे चेअरमन

आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीमध्ये मोठा बदल झाला आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीमध्ये मोठा बदल झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. (Akash Ambani)

बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की बोर्डाची बैठक 27 जून 2022 रोजी झाली होती. यामध्ये रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्तीला मान्यता दिली. रिलायन्सच्या AGM (RIL AGM) आधी ही घोषणा करण्यात आली आहे.

पंकज मोहन पवार यांना पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही. चौधरी यांना पाच वर्षांसाठी संचालक करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जून 2022 रोजी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. रिलायन्स जिओचे नवे चेअरमन आकाश अंबानी याआधी कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT