Air India
Air India Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India ने बदलले नियम, तिकिटासाठी प्रवाशांना मोजावे लागणार अधिक पैसे

दैनिक गोमन्तक

Air India Customer Care: एअर इंडियाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी मूळ भाडे सवलत निम्म्यावर आणली आहे. एअरलाइन्सकडून सांगण्यात आले की, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मूळ भाड्यात दिलेली सवलत 50 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.

आता 25% सूट मिळवा

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बेस फेअरमध्ये सुधारित सवलत 29 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. आतापर्यंत एअर इंडिया (Air India) या दोन्ही श्रेणींमध्ये 50 टक्के सूट देत होती. एअर इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 'ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना (Students) 29 सप्टेंबर किंवा त्यानंतर जारी केलेल्या तिकिटांच्या मूळ भाड्यावर 25 टक्के सवलत मिळेल. ही सवलत इकॉनॉमी क्लासमधील निवडक बुकिंग श्रेणीवर उपलब्ध असेल.

इतर श्रेणीतील सूट कायम राहील

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मार्केटमधील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सवलतींमध्ये बदल केले आहेत. ते पुढे म्हणाले की, इतर खाजगी विमान कंपन्यांच्या तुलनेत, मूळ भाड्यावर सवलत जवळजवळ दुप्पट आहे. याशिवाय इतर श्रेणींमध्येही शिथिलता कायम राहणार आहे.

तसेच, टाटा समूहाने तोट्यात चाललेल्या एअर इंडियाचे या वर्षी 27 जानेवारी रोजी सरकारकडून अधिग्रहण पूर्ण केले. ताब्यात घेतल्यानंतर, एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या (Employees) हितासाठी अनेक पावले उचलली गेली, ज्या अंतर्गत कंपनीकडून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय विम्याची सुविधा दिली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT