Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतरही अदानींनी गाडले झेंडे; 'या' कंपनीने कमावला बंपर नफा!

Adani Transmission Share Price: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती.

Manish Jadhav

Adani Transmission Share Price: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती. जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली.

एका महिन्याहून अधिक काळ टिकलेल्या या घसरणीमुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. परंतु अदानी समूहाच्या अदानी ट्रान्समिशनने (ATL) मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. कंपनीला झालेल्या नफ्याचा परिणाम शेअरवरही दिसून येतो.

गेल्या वर्षी 237 कोटींचा निव्वळ नफा कमावला होता

अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) चा निव्वळ नफा 2022-23 च्या मार्च तिमाहीत 85.48 टक्क्यांनी वाढून 439.60 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 237 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

समीक्षाधीन कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 3,165.35 कोटी रुपयांवरुन 3,494.84 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

निव्वळ नफा वाढून रु. 1,280.60 कोटी झाला

ATL चा निव्वळ नफा 2022-23 या आर्थिक वर्षात 1,280.60 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मागील आर्थिक वर्षात ते 1,235.75 कोटी रुपये होते. या कालावधीत एकूण उत्पन्न 13,840.46 कोटी रुपये होते, जे 2021-22 मध्ये 11,861.47 कोटी रुपये होते.

आणखी एका निवेदनात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) म्हणाले की, "आम्ही पारेषण आणि वितरण क्षेत्रात आघाडीवर आहोत. कंपनीने कार्यक्षमता, कार्यप्रदर्शन आणि मालमत्तेच्या वाढीमध्ये सातत्याने नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. अदानी ट्रान्समिशन जलद वाढीसाठी योग्य स्थितीत आहे.''

तसेच, हिंडनबर्ग यांनी अदानी समूहावर (Adani Group) शेअरच्या किमतीत हेराफेरी केल्याचा आरोप केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ञ समिती स्थापन केली होती.

गेल्या एका वर्षात 4,238 रुपयांचा उच्चांक गाठणारा अदानी ट्रान्समिशनचा शेअर मार्चमध्ये 630 रुपयांवर घसरला होता. या समभागाची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 630 रुपये आणि उच्च पातळी 4,238.55 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT