Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group IPO: गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! अदानी समूहाच्या 'या' कंपनीचा येणार IPO

Adani Group: जीत अदानी ग्रुपचा एअरपोर्ट व्यवसाय पाहतो. सध्या एअरपोर्ट व्यवसाय समूहाच्या अग्रगण्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या अंतर्गत आहे.

Manish Jadhav

Adani Group IPO: IPO द्वारे कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. वास्तविक, गौतम अदानी समूहाची कंपनी- अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचा IPO येणार आहे. गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव जीत याने ही माहिती दिली आहे. जीत अदानी ग्रुपचा एअरपोर्ट व्यवसाय पाहतो. सध्या एअरपोर्ट व्यवसाय समूहाच्या अग्रगण्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या अंतर्गत आहे.

काय म्हणाले जीत अदानी?

समूहाच्या एअरपोर्ट व्यवसायाचे प्रमुख जीत अदानी म्हणाले - आमच्यासमोर काही टार्गेट आहेत, ते पार केल्यानंतर एअरपोर्ट व्यवसाय लवकरच सूचीबद्ध केला जाईल. हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना जीत अदानी म्हणाले की, एअरपोर्ट व्यवसायात लक्षणीय वाढ होत आहे. अदानी एअरपोर्ट मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवते आणि नवी मुंबई विमानतळ विकसित करत आहे. कंपनी अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील एअरपोर्ट चालवते.

नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार?

जीत अदानी म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की, अदानी समूहामार्फत चालवल्या जाणार्‍या सर्व विमानतळांचा सध्या विस्तार सुरु असून ते पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. 2022 मध्ये अदानी ग्रुपने अदानी विल्मारचा आयपीओ लॉन्च केला होता. अदानी विल्मारच्या शेअर्सची लिस्टिंग 8 फेब्रुवारी 2022 रोजी झाली होती. कंपनीची इश्यू प्राइस ₹218 ते ₹230 होती. कंपनीचे शेअर्स 8 फेब्रुवारी रोजी बीएसईवर 221 रुपयांच्या सवलतीने लिस्टिंग झाले. तथापि, नंतर या शेअर्सने गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT